ब्रेकिंग

कोपरगाव येथील ओम साई ग्रामिण शिक्षण संस्थेत २०२३-२४ करीता प्रवेश सुरू- साबळे

कोपरगाव येथील ओम साई ग्रामिण शिक्षण संस्थेत २०२३-२४ करीता प्रवेश सुरू- साबळे

संपादक :- रविंद्र जगताप

कोपरगाव – कोपरगाव येथील ओम साई ग्रामिण शिक्षण संस्थेत शासनमान्य विविध अभ्यासक्रमास शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता शासन नियम अटी व शर्थीस अधीन राहत प्रवेश देणे सुरू झाले असून तरी गरजूंनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांनी केले आहे.साबळे यांनी माहीती देतांना सांगितले की, संस्थेत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ मान्यता प्राप्त बाळासाहेब सातभाई कौशल्य विकास संस्थेत देश विदेशात १०० टक्के नोकरीची हमी असणारा हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी हा एक वर्षाचा अभ्यासक्रमास प्रवेश घेऊन ओपले भविष्य उज्वल करू शकता. प्रवेश घेताच नोकरी आह्मी देतो त्यामुळे नोकरी करून मिळणाऱ्या पगारातून देखील टप्याने फी जमा करू शकता. आजपर्यंत आमचे अनेक विद्यार्थी यशस्वी झाले असून अनेक विद्यार्थी सिंगापूर, मलेशिया, दुबई, जपान, लंडन, ऑस्ट्रेलिया आदी देशात नोकरी करून आले आहे तर अनेक विद्यार्थी देशातील अनेक राज्यातील मोठमोठ्या शहरात नोकरी करत आहे.

ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर
 सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल
 लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/JywJRdA1v4oJ19TOQro9T2

स्वतःचा बांधकाम ठेकेदाराचा परवाना काढण्यास पात्र व शासकीय नोकरीस पात्र असणारा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर (स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक) या आभ्यासक्रमास प्रवेश सुरू आहे. हा अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग नागरपलीका आदी विभागातून बांधकाम ठेकेदाराचे वर्ग ७ चे रजिस्ट्रेशन करून बंधक ठेकेदार होता येते तर आज आमचे अनेक विद्यार्थी यशस्वी झाले आहे.तसेच संस्थेचे पुणे परीक्षा बोर्ड मान्यता प्राप्त कमलाताई बाळासाहेब सातभाई तांत्रिक ज्युनिअर कॉलेज मध्ये इ.११ वी व इ.१२ वी (बिल्डिंग मेंटेनन्स) तसेच इ.१२ वी आर्ट, कॉमर्स, सायन्स खाजगी विद्यार्थी प्रवेश परीक्षा केंद्रात आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करू शकता. आज रोजी आमचे अनेक विद्यार्थी यशस्वी झाले आहे.तसेच महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मान्यता प्राप्त नियमित शिक्षणासाठी व सर्व शासकीय कामकाजात उपयुक्त इ.५ वी व इ. ८ वी या वर्गास प्रवेश घेऊन निरक्षर असलेला व्यक्ती देखील प्रवेश घेऊन आपले अपूर्ण शिक्षण पूर्ण करू शकतो. या करिता कोणत्याही प्रकारे वयाची अट नसून आधार कार्ड असलेला कोणीही प्रवेश घेऊ शकतो.तालुक्यातील पूर्व भागातील एकमेव महाराष्ट्र शासन मान्य साई शक्ती इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये एल. के .जी ते यु.के.जी व इ १ ली ते इ ८ वी या इंग्रजी माध्यमाच्या वर्गास अगदी कमीत कमी फी मध्ये प्रवेश देणे सुरू असून त्या सोबतच शासकीय नियमानुसार आर.टी.ई. अंतर्गत पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांस इ १ली ते इ ८ वी पर्यंत मोफत (शैक्षणिक शुल्क माफ) शिक्षण दिले जाणार आहे तरी पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश आजच निश्चित करावा.नुकतीच संस्थेस भारत सरकार मान्यताप्राप्त राष्ट्रीय संगणक साक्षरता मिशन ची मान्यता मिळाली असून या अंतर्गत नर्सिंग, पत्रकारिता, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, मॅकनिक, ड्रायव्हर, पार्लर, टेलरिंग, अंगणवाडी शिक्षिका, योगा शिक्षिका, विविध विषय शिक्षक पात्रता कोर्से, अकौंटिंग आदी भरपूर कोर्सेस ला प्रवेश देणे सुरू असून गरजूंनी या संधीचा लाभ घेण्यासाठी शासकीय आय.टी. आय कॉलेज समोर महात्मा गांधी प्रदर्शन मध्ये असलेल्या संस्थेच्या कार्यालयात अथवा ९८२३७६२०८७, ९३०७६१९५४५, ९७३०३१२००६, ८८०५७४९१५७, ९१५८६६९९२५, ८७९३५२६९५२  या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन साबळे यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे