कृषीवार्ता
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे उस उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शक मेळावे
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे उस उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शक मेळावे
संपादक :- रविंद्र जगताप
कोपरगाव :- सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद शेतक-यांचे प्रति एकरी उत्पादन वाढविण्यासाठी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी उसतज्ञ सुरेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शक मेळाव्याचे १७ व १८ मे रोजी आयोजन केले असून सभासद शेतक-यांनी यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन उपाध्यक्ष रमेश घोडेराव, सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी केले आहे.
ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल लिंक दाबा https://chat.whatsapp.com/JywJRdA1v4oJ19TOQro9T2

१७ मे रोजी सकाळी ९ वाजता उत्सव मंगल कार्यालय रवंदे येथे ब्राम्हणगांव व वाकद गट, दुपारी ३ वाजता शहाजापुर (कोळपेवाडी) येथील साई आरती लॉन्स येथे दर्डे को-हाळे, कुंभारी व वेळापुर गट, तर १८ मे रोजी सकाळी ९ वाजता सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखाना शिंगणापुर कार्यस्थळ दहेगांव, करंजी, जेऊरकुंभारी, वारी व येवला तर दुपारी ३ वाजता सुभद्रा लॉन्स वैजापुर येथे वैजापुर, लाडगांव व श्रीरामपुर विभागातील उस उत्पादक सभासद शेतक-यांनी उपस्थित राहुन उसतज्ञ सुरेश माने यांच्या मौलिक मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन कारखान्याच्या शेतकी विभागाने केले आहे.

