सामाजिक

श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन करतांना शब्दही कमी पडतील – आ. आशुतोष काळे

श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन करतांना शब्दही कमी पडतील – आ. आशुतोष काळे

संपादक:-रविंद्र जगताप

कोपरगाव प्रतिनिधी  :- विविध भाषांवर प्रभुत्व, कट्टर धर्माभिमानी, धाडसी, वादळाप्रमाणे शत्रूवर चालून जावून शत्रूला नामोहरम करणारे, शत्रूच्या काळजात धडकी भरविणारे व समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचे वर्णन करतांना शब्दही कमी पडतील असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले.

ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर
 सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल
 लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/JywJRdA1v4oJ19TOQro9T2

कोपरगाव येथे श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित श्री छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती कोपरगाव यांच्या वतीने श्री छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त अवधूत गांधी आळंदीकर यांच्या भक्ती-शक्ती संगम ह्या भारुड व पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आ. आशुतोष काळे यांनी श्री छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करून सर्वाना श्री छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी परमपूज्य महंत कैलासनंदगिरी महाराजश्री छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समितीचे सर्व सदस्यराष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूलेमाजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावकेमंदार पहाडेसंदीप पगारेरमेश गवळीकृष्णा आढावफकीर कुरेशीराजेंद्र वाकचौरेयुवक शहराध्यक्ष नवाज कुरेशीबाळासाहेब रुईकरइम्तियाज अत्तारऋषीकेश खैरनारमहेश उदावंतराजेंद्र आभाळेसोमनाथ आढावविशाल निकमरहेमान कुरेशीशुभम लासुरेशिवाजी कुऱ्हाडेसागर लकारेरविंद्र चव्हाणओंकार वढणेऋतुराज काळेरितेश राऊतप्रसाद रुईकर आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे