राजकिय
कोळगावथडी प्रगत शेतकरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी दीपक राऊत तर उपाध्यक्षपदी शिवाजी चव्हाण यांची बिनविरोध निवड.
कोळगावथडी प्रगत शेतकरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी दीपक राऊत तर उपाध्यक्षपदी शिवाजी चव्हाण यांची बिनविरोध निवड.
संपादक:- रविंद्र जगताप
कोपरगाव : तालुक्यातील कोळगावथडी प्रगत शेतकरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी दीपक पुंजाजी राऊत तर उपाध्यक्षपदी शिवाजी लक्ष्मण चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड एकमताने करण्यात आली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) नामदेवराव ठोंबळ, आय. आय. शेख यांनी काम पाहिले.

याप्रसंगी संस्थेचे संचालक पुंजाजी चिमाजी राऊत, मार्गदर्शक नानासाहेब जंगलीराम पंडोरे, संचालक रामदास किसन वाकचौरे, किसन चिमाजी राऊत, कांताराम बाबुराव लुटे, राहुल पुंजाजी राऊत, कारभारी सावळेराम कोळपे, उत्तम बाळाजी मेहरखांब, तुषार किसन राऊत, विमल माणिकराव वाकचौरे, शुभांगिनी राहुल राऊत, कृष्णा रामप्रसाद निंबाळकर, सचिव शांताराम सुकदेव कदम आदी प्रमुख उपस्थित होते. संस्थापक पुंजाजी चिमाजी राऊत यांनी आभार मानले
शिर्डीत देशातील सर्वात मोठा महापशुधन एक्स्पो, शेतकरी, बेरोजगार पशुप्रेमीसाठी आनंदाची पर्वणी सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा


