महाराष्ट्र

वारीचे गीताप्रेमी ह भ प सुखदेव कानडे पंचतत्वात विलिन

वारीचे गीताप्रेमी ह भ प सुखदेव कानडे पंचतत्वात विलिन

कोपरगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वारी येथील वारकरी संप्रदायातील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व संपूर्ण भगवत गीता मुखोदगत असणारे ह भ प सुखदेव कारभारी कानडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे ते ८४ वर्षाचे होते संस्कृत विषयात त्यांचे विशेष नैपुण्य होते वारीचे ग्रामदैवत रामेश्वर भगवान व जगदंबा देवीचे ते निस्सीम भक्त होते संपूर्ण श्रीमद भगवत गीता त्यांची मुखोदगत होतीच त्या बरोबरच विष्णु सहस्रनाम, भजन काकडा हरिपाठ, अभंग ,अनेक स्तोत्र मंत्र त्यांचे मुखोदगत होतेनजर कमी असूनही त्यांनी वारीत अनेक वर्षे शेवटच्या घटिकेपर्यत गीता पारायण व्यासपीठ चालविले त्यांच्या जाण्याने वारी परिसरात आध्यत्मिक क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष तथा शिवसेनेचे माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव कानडे व वारीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सतिषभाऊ कानडे यांचे ते वडील होते त्यांचा दशक्रिया विधी सोमवार दिनांक २२ मे रोजी गोदावरीच्या तिरावर वारी येथे होणार असुन प्रसिद्ध कीर्तनकार तथा साई कथाकार ह भ प बाळकृष्ण सुरासे महाराज यांचे कीर्तन होणार आहे त्यांच्या पश्चात पत्नी मुले , मुली, पुतणे ,नातु, नाती ,पणतू असा मोठा कानडे परिवार आहे

ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर
 सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल
 लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे