महाराष्ट्र

संभाव्य आपत्तीचे योग्य नियोजन करा – आ. आशुतोष काळे आपत्ती व्यवस्थापन बैठकीत सर्व विभागांना सूचना

आपत्ती व्यवस्थापन बैठकीत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना संभाव्य आपत्ती निवारणा बाबत मार्गदर्शन करतांना आ. आशुतोष काळे समवेत प्रभारी तहसीलदार विकास गंबरे व विविध विभागाचे अधिकारी, कार्यकर्ते व नागरिक.

संभाव्य आपत्तीचे योग्य नियोजन करा – आ. आशुतोष काळे आपत्ती व्यवस्थापन बैठकीत सर्व विभागांना सूचना

कोपरगाव प्रतिनिधी  :- पावसाळ्यात कुठेही पाणी साचून नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेवून आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास अडचणीच्या वेळी नागरिकांना तातडीने मदत मिळाली पाहिजे त्यासाठी सर्व विभागांनी संभाव्य आपत्तीचे योग्य नियोजन करावे. आलेली आपत्ती नागरिकांवर आली नसून ती आपत्ती आपल्यावर आली आहे असे समजून काम करा अशा सूचना देत आ. आशुतोष काळे यांनी देवून अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली  कोपरगाव शहर व तालुक्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणी दूर करण्यासाठी करावयाच्या उपयायोजना बाबत आ. आशुतोष काळे यांनी महसूल, कोपरगाव नगरपरिषद, पंचायत समिती, शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन, कृषी अधिकारी,उर्जा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य, पशु वैद्यकीय, अग्निशमन, पाटबंधारे, जल निस्सारण आदी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत तहसील कार्यालयात बैठक घेतली. आपत्तीच्या काळात योग्य नियोजन करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची असून योग्य नियोजन न झाल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करून अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी करून त्यांना सूचना केल्या.

        

ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर
 सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल
 लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS
जाहिरात

 

       

  सर्व पुलांच्या कामाची पाहणी करून घ्या. कोपरगाव शहरातील ब्रिजलाल नगर येथे येणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी उपाय योजना करा, खडकी नाला, हद्दवाढ भागातील कर्मवीर नगर मध्ये येणाऱ्या पाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेज लाईन टाका, पावसाळयापूर्वी खंदकनाल्याची साफ सफाई पूर्ण करा, जेऊर पाटोदा शिव रस्त्यालगत असलेला नैसर्गिक नाला खुला करण्याच्या सूचना दिल्या. मागील वर्षी निर्माण झालेल्या अडचणी यावर्षी पुन्हा निर्माण होणार नाही याची जलनिस्सारण विभागाने खबरदारी घेवून पाण्याचा निचरा होण्यासाठी नैसर्गिक ओढे-नाल्यांची साफ सफाई समितीने पावसाळ्याच्या आत तातडीने पूर्ण करून घ्यावी. याबाबत जलनिस्सारण विभागाने पूर्ण झालेली कामे व प्रलंबित असलेल्या कामांचा आढावा घेवून प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. ग्रामीण भागातील सुरेगाव, मंजूर, कोळगाव थडी, पोहेगाव, सोनेवाडी,हरीसन ब्रँच, डाऊच, टाकळी-ब्राम्हणगाव, दहेगाव, खिर्डी गणेश, सी.व्ही. २९ व कॅटल ब्रीडिंग चर योजनाचे काम पूर्ण करा. ग्रामीण भागातील शहापूर वशापांढरी शिंदे वस्ती पर्यंत येणाऱ्या पाण्याचे सांडव्याचे नियोजन, खडकी नाला पूल, संवत्सर दशरथवाडी वाघी नाला पूल, मायगाव देवी चौफुली साईड गटार, बक्तरपूर बंधारा गेट, संवत्सर मनाई पूल, धारणगाव येथील नानासाहेब दवंगे यांच्या शेतात साचणारे पाणी, जेऊर पाटोदा येथील आनंद नगर येथे पावसाळ्यात कायम साचणारे पाणी आदी समस्या सोडवा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी दिल्या.  या बैठकीसाठी प्रभारी तहसीलदार विकास गंबरे, गटविकास अधीकारी सचिन सूर्यवंशी, भूमी अभिलेखचे एस.जे. भास्कर, जि. प. उपअभियंता सी.डी. लाटे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी एस.आर. वाघ, पी.एस. खेमनर, कृषी अधिकारी मनोज सोनवणे, गोदावरी डावा तट कालवा उपविभागीय अभियंता बी.जी. शिंदे, सहाय्यक अभियंता एस.टी. ससाणे, एस.बी. चौधरी, बी.आर. पवार, गोदावरी कालवे जलनिस्सारण उपविभागीय अभियंता किरण तुपे, कि.गो. शिंदे, अ.भा. शिंदे, तालुका पशुधन अधिकारी डॉ. डी.पी. दहे, पं. स. पशुधन विकास अधिकारी डॉ.डी.एन.जामदार, पंचायत समिती सहाय्यक अभियंता बी.के. साबळे, पंचायत समिती कृषी अधिकारी एस.डी. कोष्टी, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.एम. यादव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, आगार व्यवस्थापक अमोल बनकर, ग्रामीण पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, शहर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, रेल्वे विभागाचे किरण सोलेट, विशाल सोमवणे, बी.बी. वाघमोडे, महावितरण अभियंता पी.बी. बोंडखळ, सहाय्यक अभियंता वाय.एम. शेलार, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, सार्वजनिक बांधकाम शाखा अभियंता डी.बी. लाटे, उपअभियंता व्ही.बी. शिंदे, टी.के. थोरात, ए.ए.भालेराव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, कारभारी आगवण, जिनिंग प्रेसिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार,  कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, शंकरराव चव्हाण, गंगाधर औताडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे, संचालक राजेंद्र निकोले, रामदास केकाण,पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचे चेअरमन देवेन रोहमारे, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे, राजेंद्र खिलारी, गोपीनाथ रहाणे, जयराम थेटे, किसन आहेर, प्रकाश महाले, अनिल महाले, छगन देवकर, नंदकिशोर औताडे, ज्ञानेश्वर जेजुरकर, विरेंद्र शिंदे, मनोज वाबळे, डॉ. कृष्णा मलिक, ज्ञानेश्वर गव्हाणे, नानासाहेब चौधरी, भाऊसाहेब औताडे, विरेंद्र शिंदे, गजानन मते, सुनील औताडे, संतोष वर्पे, बाळासाहेब औताडे, मीननाथ गुडघे, किशोर शिंदे, संतोष गुडघे, रविंद्र चोपडे, किशोर जावळे, बाबासाहेब रहाणे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे