नितीनराव जयसिंगराव बनसोडे यांची वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विविध मान्यवरांनी केला सत्कार
नितीनराव जयसिंगराव बनसोडे यांची वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विविध मान्यवरांनी केला सत्कार
संपादक :- रविंद्र जगताप
कोपरगाव शहरातील नितीनराव बनसोडे यांची कोपरगाव तालुका वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांचा कोपरगाव मध्ये मोठ्या प्रमाणात सत्कार करण्यात येत आहे. कोपरगाव तालुका हा आंबेडकरी चळवळीचा तालुका ओळखला जातो. कोपरगाव तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला मानणारा एक मोठा वर्ग आहे. गेल्या विधानसभा त्याचबरोबर लोकसभा देखील मोठ्या ताकतीने वंचित बहुजन आघाडीने लढविल्या होत्या या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने चांगले मत मिळवले असून वंचित बहुजन आघाडीचे कोपरगाव तालुक्यामध्ये मोठे नेटवर्क आहे कोपरगाव तालुक्यामध्ये विविध समाज जाती धर्माचे लोकांना एकत्रित करून कोपरगाव मध्ये वंचित बहुजन आघाडीने मूठ बांधली आहे. नुकतेच कोपरगाव तालुका अध्यक्षपदी नितीन जयसिंगराव बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे त्यांचे कोपरगाव तालुक्यातून विविध संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. नितीन राव बनसोडे यांचे वडील जयसिंगराव बनसोडे यांनी देखील आंबेडकर चळवळीमध्ये काम केलेले आहे नितीन राव बनसोडे यांचे वडील जयसिंगराव बनसोडे यांनी रिपब्लिकन चळवळीमध्ये आपले योगदान दिले होते त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून नितीन राव बनसोडे देखील आंबेडकर चळवळीमध्ये सक्रिय असून नुकतेच वंचित बहुजन आघाडीच्या कोपरगाव तालुकाध्यक्षपदी ते विराजमान झाले आहे त्यांचे बंधू गौतमराव बनसोडे देखील घटनाकार मैत्री संघाच्या माध्यमातून आंबेडकर चळवळीमध्ये काम करत आहे नितीन राव बनसोडे यांच्या नियुक्तीमुळे अनेक संघटना त्याचबरोबर विविध मान्यवरांनी त्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.याप्रसंगी वंचितचे उत्तर महाराष्ट्र संघटक शरद खरात,जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे,अनिल बनसोडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी तसेच जयसिंगराव बनसोडे प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष गौतम बनसोडे संजय ससाने शकील तांबोळी काँग्रेसचे साबळे सर अनिल देसाई यांच्यासह विविध संघटनांनी सत्कार करून भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे.
ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल लिंक दाबा https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS



