ब्रेकिंग

रयत शिक्षण संस्थेच्या उत्तरविभाग अध्यक्षपदी आमदार आशुतोष काळेंची फेर निवड

रयत शिक्षण संस्थेच्या उत्तरविभाग अध्यक्षपदी आमदार आशुतोष काळेंची फेर निवड

                    

कोपरगाव प्रतिनिधी :- रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांनी उत्तर विभागीय अध्यक्षपदाची सोपविलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्यावर पुन्हा एकदा उत्तर विभागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देवून त्यांची एकमताने फेर निवड करण्यात आली आहे. रयत शिक्षण संस्थेसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या व रयत शिक्षण संस्थेचा विस्तार वाढविण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या विचारांचा वारसा घेवून माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणाऱ्या आ. आशुतोष काळे यांच्या खांद्यावर रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांनी तीन वर्षापूर्वी उत्तर विभागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी टाकली होती.मागील तीन वर्षात दिलेली जबाबदारी समर्थपणे सांभाळून मतदार संघाचा केलेला सर्वांगीण विकास अशी दुहेरी जबाबदरी आ. आशुतोष काळे यांनी चोखपणे पार पाडली आहे. त्यामुळे उच्च विद्याविभूषित असलेल्या आ. आशुतोष काळे यांच्यावर पुन्हा एकदा रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे त्याबद्दल सर्व क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांनी माझ्या कार्यपद्धतीवर दाखविलेल्या विश्वासामुळे माझी पुन्हा रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्या अध्यक्षपदावर निवड झाली आहे. बदलत्या शैक्षणिक धोरणानुसार स्पर्धेच्या युगात रयतचा विद्यार्थी कुठेच कमी पडणार नाही याची काळजी घेवू. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे आदर्श विचार डोळ्यासमोर ठेवून माझी वाटचाल अशीच सुरु राहणार असून संस्थेचा नावलौकिक वाढविण्यासाठी सदैव प्रयत्न करणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर
 सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल
 लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS
जाहिरात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याचा विकास करायचा असेल तर विकासात मागास असलेला भाग मुंबई व पोर्टशी जोडणे अत्यंत आवश्यक होते. समृद्धी महामार्ग राज्याचा आर्थिक कॅरिडॉर ठरणार आहे. यामुळे राज्यातील १५ जिल्ह्यांचे भाग्य बदलणार आहे. ७०१ किलोमीटर महामार्गाची उभारणी विक्रमी अशा ९ महिन्याच्या कालावधीत पूर्ण होणारा समृद्धी हा देशातला एकमेव महामार्ग आहे. महामार्गासाठी केलेल्या भूसंपादनाचा शेतकऱ्यांना विक्रमी मोबदला देण्यात आला. पुढील सहा महिन्यात समृद्धी प्रकल्प पूर्ण करण्यात येईल. महामार्गावर वाहन चालकांनी वाहन चालवितांना वेग मर्यादा पाळावी. असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.समृद्धी महामार्ग, ट्रान्स हॉर्बर लिंक रोड, कोस्टल रोड सारख्या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा बळकट होणार आहेत. नागपूर ते गोवा, मुंबई ते गोवा या महामार्गामुळे येत्या काळात महाराष्ट्राचे चित्र बदलण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याचे काम शासन करत आहे. असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.महसूलमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले की, समृद्धी महामार्गामुळे शिर्डी व परिसराच्या विकासाला चालना मिळणार आहे. रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. यामुळे हा परिसर मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाशी जोडला जाणार आहे. समृद्धीच्या भूसंपादनासाठी शिर्डी व परिसरातील शेतकऱ्यांनी सहकार्य केले. शिर्डी विमानतळाच्या ६०० कोटींच्या टर्मिनल इमारतीमुळे विमान फेऱ्या वाढणार आहेत.

समृद्धी महामार्ग दुसऱ्या टप्प्याची वैशिष्ट्ये –
समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात ७ मोठे पूल, १८ छोटे पूल, वाहनांसाठी ३० भुयारी मार्ग, हलक्या वाहनांसाठी २३ भुयारी मार्ग, ३ पथकर प्लाझावरील तीन इंटरचेंज, ५६ टोल बूथ, ६ वे ब्रिज आदी सुविधांचा समावेश आहे. शिर्डी ते इगतपुरी तालुक्यामधील भरवीर पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाच्या या दुसऱ्या टप्प्याचा खर्च ३२०० कोटी रुपये असून लांबी ८० कि मी आहे. दुसऱ्या टप्प्यात आजपासून ७०१ कि.मी पैकी आता एकूण ६०० कि.मी लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीस खुला झाला आहे

ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर
 सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल
 लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे