कृषीवार्ता

हरिसन ब्रॅच चारीला कमी दाबाने पाणी पुरवठा:- भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष सुधाकर वक्ते

हरिसन ब्रॅच चारीला कमी दाबाने पाणी पुरवठा:- भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष सुधाकर वक्ते

शेतकऱ्यांचे भरणे झाले अवघड

जेऊर कुंभारी वार्ताहर

गोदावरी उजव्या कालव्याला पाणी सुटून महिना होत आला आहे चितळीला पाणी पोहोचल्यानंतर तीन ते चार दिवसात हरिसन ब्रॅच चारीला पाणी सोडले जात होते पण जेऊर कुंभरी गावातील नागरिकांच्या मागणीनंतर काल हरिसन ब्रॅचचारीला पाणी सोडण्यात आले पण ते कमी दाबाने, त्यामुळे शेतकऱ्यांचे भरणे होणे अवघड आहे असे चिंताजनक वक्तव्य भाजपा युवा मोर्चा उपअध्यक्ष सुधाकर वक्ते यांनी प्रसिद्धी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात केले आहे.हरिसन ब्रॅच चारीने जेऊर कुंभारी, पानमळा,डाऊच खुर्द, चांदेकसारे गावातील शेतकऱ्यांच्या शेतीला व गावाला नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत असते हरिसन ब्रॅच चारीला आता सध्या कमी दाबाचे व दोन फूट पाणी चालू आहे सध्या शेतीमध्ये ऊस, मका, फळबाग यांना पाणी देत असताना शेतकऱ्यांना उन्हाच्या तीव्रतेमुळे कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे पाटबंधारेच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजीची भावना निर्माण झाली आहे पाटबंधारे च्या अधिकाऱ्यांनी हरिसन ब्रॅच चारीला जास्त पाणी द्यावे असे वेळोवेळी सांगूनही अधिकारी वर्ग जाणून-बुजून याकडे दुर्लक्ष करत आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.माजी स्व .मंत्री शंकरराव कोल्हे साहेब माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे,औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक विवेक भैय्या कोल्हे यांनी हरिसन ब्रॅच चारीला पाणी सोडण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केलेला आहे .स्व.शंकराव कोल्हे साहेब हे हरिसन ब्रॅच चारी लगत असणाऱ्या गावांना कॅलिफोर्निया म्हणून संबोधत होते पण आता पाटबंधारे च्या दुर्लक्ष ते मुळे या भागात वाळवंट होत चाललेले आहेत वेळेवर पाटाला पाणी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे उभे पीक जळून खाक होत आहे शेतकरी कर्जबाजारी होत चाललेला आहे हे सर्व पाटबंधारे च्या हलगर्जीपणामुळे होत आहे असे सुधाकर वक्ते यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे

ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर
 सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल
 लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे