महाराष्ट्र

कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के. बी. रोहमारे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय,कोपरगाव येथे हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन.

कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के. बी. रोहमारे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय,कोपरगाव येथे हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन.

संपादक:- रवींद्र जगताप

के बी रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ या अभियाना अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले यामध्ये तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॅनव्हास ,तिरंगा प्रतिज्ञा व तिरंगा सेल्फी इत्यादी उपक्रम राबविण्यात आले तसेच 14 ऑगस्ट रोजी कोपरगावातील माजी सैनिकांचा सत्कार सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोपरगाव तालुक्यातील माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री गांगवे युवराज हे होते व कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. भोसले बी.बी. तसेच महाविद्यालयाचे सन्माननीय रजिस्टार डॉक्टर ए.सी.नाईकवाडे होते. यावेळेस माजी सैनिक श्री जगताप जालिंदर, श्री सचिन शेळके, श्री सागर शेंडगे, श्री गणेश रक्ताटे, श्री मच्छिंद्र चौधरी यांचे सत्कार करण्यात आले.रजिस्ट्रार डॉ. ए . सी. नाईकवाडे  यावेळेस कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री गांगवे युवराज यांनी सैनिकांचे जीवन व प्रत्येक विद्यार्थ्याने मेहनत करून आपले ध्येय साध्य करावे याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सन्माननीय श्री सोनवणे बी.आर., श्री जगझाप एस.बी., श्री होन बी. डी. व इतर शिक्षक रुंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भोंडवे जे.आर. व आभार प्रा. जेजुरकर जी.ए. यांनी केले.

हर घर तिरंगा अभियानासाठी महाविद्यालयातील प्रा. जाधव डी.जे.प्रा. बुधवंत डी. एस., प्रा. वाघ ए.जी., क्रीडा शिक्षक कांबळे एम. व्ही. व इतर शिक्षक वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले व हर घर तिरंगा अभियान महाविद्यालयात यशस्वीपणे संपन्न केले.

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे