आरोग्य व शिक्षण

वेदांत भाकरेचे दहावी परिक्षेत स्पृहणीय यश-स्नेहलता कोल्हे.

संवत्सर येथील वेदांत राजेंद्र भाकरे याचा दहावी गुणवंत परिक्षेतील यशाबददल कोपरगांव शहर व तालुका भारतीय जनता पक्ष तसेच संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने सोमवारी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

वेदांत भाकरेचे दहावी परिक्षेत स्पृहणीय यश-स्नेहलता कोल्हे. 

संपादक :- रविंद्र जगताप

कोपरगांव :- शिक्षक मुलांना ज्ञानार्जन करून घडवत असतात, परिक्षा हया मुलांचे भवितव्य काय आहे याची शिकवण देतात, संवत्सर लक्ष्मणवाडी सारख्या ग्रामिण भागात राहुन वेदांत राजेंद्र भाकरे याने दहावी परिक्षेत ९१ टक्के गुण मिळवत सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला त्याचे यश हे स्पृहणीय असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी केले. तालुक्यातील संवत्सर येथील वेदांत राजेंद्र भाकरे याचा दहावी गुणवंत परिक्षेतील यशाबददल कोपरगांव शहर व तालुका भारतीय जनता पक्ष तसेच संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने सोमवारी सत्कार करण्यांत आला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे होते. सौ. स्नेहलताताई कोल्हे पुढे म्हणाल्या की, शाहु, फुले, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासह सर्व थोर समाजसुधारकांचा शिक्षण क्रांतीत सिंहाचा वाटा आहे. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामिण भागातील मुला मुलींना दर्जेदार तांत्रीक अभियांत्रीकी, व्यवस्थापन, फार्मसी, सैनिकी आदि के. जी पासुन ते पी. जी पर्यंत शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी १९८२ पासून संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे इवलेसे रोप लावले त्याचा वेलू आज गगनावर गेला आहे. वेदांत भाकरेसह अनेक विद्यार्थ्यांनी दहावी परिक्षेत नेत्रदिपक यश मिळविले आहे. प्रत्येकाच्या आयुष्याला दिशा देणा-या दहावी बारावी हया मुख्य पाय-या आहेत असेही त्या म्हणाल्या.प्रारंभी माजी संचालक राजेंद्र भाकरे यांनी प्रास्तविक केले. संचालक ज्ञानेश्वर परजणे, बापूसाहेब बारहाते, फकिरराव बोरनारे, संजय भाकरे, विजय काळे, रामभाउ कासार, संजीवनी पतसंस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र सखाहरी परजणे, संवत्सर ग्रामपंचायतीचे सदस्य महेश परजणे, योगेश परजणे, मुकूंद काळे, विमा देने, सोपान भाकरे, गणेश साबळे, आण्णासाहेब निरगुडे, तन्मय परजणे, दत्तात्रय परजणे, बाळासाहेब परजणे, भाउसाहेब परजणे, निलेश परजणे, अशोक लोहकणे, संदिप मैद, प्रकाश सोमासे, मनोज शेटे, दिलीप कासार, अशीश बोरनारे, दिनेश बोरनारे, अनिल शेटे यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते. शेवटी संजय भाकरे यांनी आभार मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे