महाराष्ट्र

उत्तरनगर जिल्हाप्रमुख मुजीबभाई शेख यांच्या  राहाता तालुक्यातील गावांना भेटी

उत्तरनगर जिल्हाप्रमुख मुजीबभाई शेख यांच्या  राहाता तालुक्यातील गावांना भेटी

संपादक :- रविंद्र जगताप

उत्तरनगर जिल्हाप्रमुख मुजीबभाई शेख यांनी राहाता तालुक्यातील गावांना भेटी देऊन नवे जुने शिवसैनिकांचे मनोबल वाढावे म्हणून त्यांचे समस्या जाणून घेण्यासाठी व शिवसेना बळकट करण्यासाठी मोठ संघटन उभे करण्यासाठी नुकताच जळगाव वाकडी चितळी व धनगरवाडीच्या शिवसैनिकांच्या जळगाव येथे एकत्रीत गाठीभेठी घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुजीबभाई शेख, यांनी मार्गदर्शन करताना शिवसैनिकांचे मनोबल वाढावे तसेच ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न सोडवणे साठी आपण जागृत राहून शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना व युवासेनाप्रमुख माजीमंत्री आ अदित्यसाहेब ठाकरे यांचे कोरोणा काळातील कार्य तसेच शेतकरी बंधुना दोन लाखा पयॅत सरसगट कर्जमाफी .एसटी कर्मचारी बंधुना 41% टक्के पगार वाढ .असे ऐतिहासिक कार्य या सह एकना अनेक कार्य आपण तळागाळातील जनते पर्यंत पोहचवुन घर तिथे शिवसैनिक .गाव तिथे शिवसेना. तसेच वंदनीय दैवत बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या मंत्राचा. 20% राजकारण. 80% समाजकारण हे ब्रिदवाक्य घेऊन आपण जनतेची सेवा करणार आहे. असे सांगुन शिवसैनिकांनी खंबीर पण एकसंघ राहुन शिवसेना पक्ष वाढवावा असे सांगितले. याप्रसंगी राहाता उपताप्रमुख बाबासाहेब चौधरी यांनी जिल्हाप्रमुख मुजीबभाई शेख यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच कार्यक्रमास जेष्ठ शिवसैनिक मार्गदर्शक माजी उपजिल्हाप्रमुख रावसाहेब गुंजाळ,अरूण पाटील . सदाभाऊ कराड, विद्यामान उपजिल्हाप्रमुख शेखर दुबया, अशोक मगर संगमनेर उपशहरप्रमुख विकास डमाळे, प्रवीण क्षत्रिय, राहता तालुका उपप्रमुख बाबासाहेब चौधरी, पत्रकार बाबासाहेब मंडलिक, धनगरवाडी शाखाप्रमुख अमोल साखरे, मसु गायकवाड, विजय चौधरी, विकी वाघ, खंडू चव्हाण, दत्तू चव्हाण, यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर
 सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल
 लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS
जाहिरात

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे