कृषीवार्ता
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघात सोयाबीन, मका बियाणे विक्रीसाठी उपलब्ध_विवेकभैय्या कोल्हे.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघात सोयाबीन, मका बियाणे विक्रीसाठी उपलब्ध_विवेकभैय्या कोल्हे.
कोपरगांव चालू खरीप हंगामासाठी ५६० क्विंटल सोयाबीन तर २०० क्विंटल मका महाबीज व कृभको बियाणे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ कोपरगाव व ९ शाखेअंतर्गत विक्रीसाठी उपलब्ध असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी केले आहे. ते पुढे म्हणाले की, सोयाबीन, मका बियाण्याबरोबरच मुग, तुर, उडीद, ताग, धैच्या बियाणे देखील उपलब्ध आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत सवलतीच्या ‘दरात बियाने योजनेच्या लाभासाठी जवळच्या सेतू कार्यालयात जाऊन शासनाच्या महाडीबीटीवर सातबारा, आठ अ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, भ्रमणध्वनीसह ऑनलाईन नोंदणी करावी त्यातून तालुका कृषी अधिकारी सोडत पद्धतीतून शेतकऱ्यांना बियाण्याचे परमीट देतील तरी सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असेही शेवटी विवेकभैय्या कोल्हे म्हणाले.
ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल लिंक दाबा https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS

