आ.आशुतोष काळेंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ५ नंबर साठवण तलावाच्या काँक्रीटीकरण कामास रविवारपासून प्रारंभ
आ.आशुतोष काळेंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ५ नंबर साठवण तलावाच्या काँक्रीटीकरण कामास रविवारपासून प्रारंभ
संपादक :- रविंद्र जगताप
कोपरगाव प्रतिनिधी – कोपरगाव शहराच्या नागरिकांचा पिण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी आ.आशुतोष काळे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ५ नंबर साठवण तलावाचे खोदाई काम पूर्णत्वाकडे जात असून पुढील अतिशय महत्वाच्या असलेल्या काँक्रीटीकरण कामास आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते रविवार (दि.११) पासून प्रारंभ होत आहे. मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न नक्कीच सुटू शकतो याची जाण असलेल्या आ.आशुतोष काळे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी देखील ५ नंबर साठवण तलावाचे काम सुरू करण्यासाठी केलेला संघर्ष सर्वश्रुत असून कोपरगावकरांनी हा संघर्ष पहिला आहे अनुभवला आहे व या संघर्षात कोपरगावच्या नागरिकांनी साथ देखील दिली आहे.त्यामुळे आमदार आशुतोष काळे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी कोपरगावकरांना संधी द्या, निवडून येताच पाण्याचा प्रश्न सोडून दाखविन असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनावर विश्वास ठेवून कोपरगावच्या जनतेने आमदार आशुतोष काळे यांना संधी दिली. त्या संधीचे सोने करतांना त्यांनी निवडून येताच दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करून दोनच महिन्यातच पाच नंबर साठवण तलावाच्या कामास प्रारंभ केला. या साठवण तलावासाठी त्यांनी तब्बल १३१.२४ कोटी निधी आणून दिलेला शब्द पूर्ण केला.

जेव्हापासून साठवण तलावाचे काम सुरू आहे तेव्हापासून शहरातील नागरिकांना देखील आपला पाणी प्रश्न ज्या ५ नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून सुटणार आहे त्या साठवण तलावाचे सुरू असलेले काम कोपरगाव शहरातील हजारो नागरिक स्वतः जावून पाहत असून यामध्ये विशेषतः महिलांची संख्या जास्त आहे. शहरातील नागरिकांना कधी काम पूर्ण होते व नियमित पाणी कधी मिळते याची उत्सुकता लागली आहे
ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल लिंक दाबा https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS

साठवण तलावाचे काम शीघ्र गतीने व्हावे यासाठी साठवण तलावाच्या सुरू असलेल्या कामाकडे आ.आशुतोष काळे हे बारीक लक्ष ठेवून आहेत.ज्या ज्या वेळी अडचणी निर्माण झाल्या त्या अडचणींवर तात्काळ मात करून शीघ्र गतीने काम सुरू ठेवून लवकरात लवकर खोदकाम पूर्ण करण्यावर भर दिल्यामुळे या साठवण तलावाचे काम लवकर पूर्णत्वाकडे जात असून पुढील कामाचा अतिशय महत्वाचा टप्पा असलेल्या काँक्रीटीकरण कामास रविवार (दि.११) पासून प्रारंभ होत आहे. खोदकाम अंतिम टप्प्यात असल्यामुळे पुढील कामास गती मिळणार असून त्यामुळे लवकरच कोपरगावकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. रविवार रोजी सायंकाळी ०४.०० वाजता आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते काँक्रीटीकरण कामास शुभारंभ होत आहे. ५ नंबर साठवण तलाव येसगाव एक्स्प्रेस कॅनॉललगत या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमास कोपरगाव शहरातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.


