ब्रेकिंग

रोजगार महाकुंभातून युवकांना रोजगाराची संधी पंचक्रोशीतील युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे तहसीलदार महेश सांवत यांचे आवाहन

रोजगार महाकुंभातून युवकांना रोजगाराची संधी पंचक्रोशीतील युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे तहसीलदार महेश सांवत यांचे आवाहन

कोपरगाव:-दि. 24 सप्टेंबर 2026 सेवा संकल्प अभियानांतर्गत युवकांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी रोजगार महाकुंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर रोजगार मेळाव्याचे आयोजन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, अहिल्यानगर यांच्या विद्यमाने दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता करण्यात आले आहे.

हा रोजगार महाकुंभ संजीवनी के. बी. पी. पॉलीटेक्निक, कोपरगाव तसेच गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिट्यूट, कोळपेवाडी, ता. कोपरगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या रोजगार मेळाव्यात विविध आस्थापना व उद्योग क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, पात्र व इच्छुक युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य व अनुभवाच्या आधारे रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.कोपरगाव तालुक्यासह पंचक्रोशीतील दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवी तसेच इतर शैक्षणिक पात्रता असलेल्या इच्छुक युवकांनी या रोजगार महाकुंभामध्ये सहभागी होऊन उपलब्ध रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोपरगाव तालुक्याचे तहसीलदार मा. श्री. महेश सावंत यांनी केले आहे.युवकांनी रोजगाराच्या संधीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे, आधारकार्ड, बायोडाटा व इतर आवश्यक कागदपत्रांसह वेळेत उपस्थित राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

स्थळ : संजीवनी के. बी. पी. पॉलीटेक्निक, कोपरगाव व गौतम पॉलीटेक्निक इन्स्टिट्यूट, कोळपेवाडी, ता. कोपरगाव

दिनांक: 29 सप्टेंबर 2026

वेळ: सकाळी 10.00 वाजता

सोबत बेरोजगार युवकांसाठी QR कोड

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे