महाराष्ट्र

सुरेगांव सोसायटी बँक पातळीवर शंभर टक्के वसुली

सुरेगांव सोसायटी बँक पातळीवर शंभर टक्के वसुली

संपादक :- रविंद्र जगताप
कोपरगांव- तालुक्यातील कोळपेवाडी परिसरातील सुरेगांव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सर्व कर्जदार सभासदांकडील कर्जाची ३० जुन पुर्वीच बँक पातळीवर शंभर टक्के वसुली झाल्याची माहिती मुख्य प्रर्वतक व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विलासराव वाबळे यांनी दिली. सचिव शांतराम कदम यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले. श्री. विलासराव वाबळे पुढे म्हणाले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलता कोल्हे यांच्या मागदर्शनाखाली सुरेगाव संस्था प्रगतीपथावर असुन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे हे सातत्याने बँक पातळीवर असणा-या योजना सुरेगांव सोसायटी सभासदांना मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत वाबळे व उपाध्यक्ष शंकरराव कदम म्हणाले की, २ कोटी १५ लाख रूपये शंभर टक्के वसुलीसाठी कर्जदार सभासदांनी देखील २० जुन पुर्वीच सोसायटीला विशेष मदत केली. याकामी सोसायटीचे मार्गदर्शक मोहनतात्या वाबळे, पांडुरंग वाबळे, छबु कुशाबा माळी, दिपक हुडे, सुकदेव भंडारे, सोपानराव सोनवणे, सर्जेराव वाबळे, गोरख कदम, रामनाथ वाबळे, यशवंत निकम, उत्तमराव निकम, राजेंद्र भंडारे, दिगंबर कदम आदिंचे विशेष सहकार्य लाभले.
सोशल मिडीया वापरतात सावधान आपल्यावर गुन्हा दाखल होवु शकतो अधिक माहिती साठी खालील लिंक दाबा
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे