सोशल मीडियाचा चांगला वापर केल्यास शासन प्रशासनाचे हात आपले सत्कार करण्यास उचलले जातील
सोशल मीडियाचा चांगला वापर केल्यास शासन प्रशासनाचे हात आपले सत्कार करण्यास उचलले जातील:- अरुण खरात
संपादक:- रविंद्र जगताप
सध्या सगळीकडेच वयोवृद्ध कलावंत शांताबाई कोपरगावकर यांच्या बातम्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियावर झळकत आहे. शांताबाई कोपरगावकर यांना मदतीचा ओघ ही सुरू झाला आहे. अनेक सामाजिक राजकीय क्षेत्रातील लोक संस्था त्यांना मदत करताना दिसत आहे. याचे सर्व श्रेय अरुण खरात या व्यक्तीला दिले पाहिजे कारण शांताबाई कोपरगावकर यांचा चेहरा त्यांच्या व्यथा वेदना दुःख अरुण खरात यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आणले आहे. तीन दिवस शोध घेतल्या नंतर शांताबाई त्यांना मिळून आल्या अरुण खरात यांनी प्रथम शांताबाई च्या शिव्या खाल्ल्या परंतु गोड गोड बोलून शांताबाई शी बातचीत केली व प्रदीर्घ मुलाखत घेऊन त्यांचे अनेक व्हिडिओ काढले त्यानंतर शांताबाई विषयी सविस्तर लिहून फेसबुक पोस्ट केली. अरुण खरात यांनी लिहिलेली ती फेसबुक पोस्ट संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झाली. त्या फेसबुक पोस्टची अनेक इलेकट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडियाने दखल घेऊन त्याच्या बातम्या केल्या डॉ.अशोक गावित्रे यांचेही खरात यांना सहकार्य लाभले व शांताबाई फेमस झाल्या. आज जागतिक सोशल मीडिया दिन आहे त्या निमित्ताने आम्ही अरुण खरात यांना संपर्क केला असता त्यांनी शांताबाईला न्याय मिळाल्यामुळे समाधान व्यक्त केले आहे. अरुण खरात म्हणाले की आज आपण बघतो की सोशल मीडियाचा चुकीचा वापर केल्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण अस्थिर झाले आहे. समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे. पोलीसांवर या गोष्टीचा प्रचंड ताण पडलेला असून बिघडलेले वातावरण शांत करण्यात त्यांचा बराचसा वेळ जात आहे परिणामी खून, दरोडे, चोऱ्या, महिलांची छेडछाड याच्या तपासात दिरंगाई होत आहे. आज जागतिक सोशल मीडिया दिनानिमित्त अरुण खरात यांनी सर्वांना असे आवाहान केले आहे की सोशल मीडियाचा वापर गरीब, वंचित, दुर्लक्षित ,अपेक्षित समाजाला न्याय मिळावा यासाठी केला पाहिजे. सोशल मीडियाचा चांगला वापर केल्यास शासन प्रशासनाचे हात आपले सत्कार करण्यास उचलले जातील परंतु सोशल मीडियाचा चुकीचा वापर केल्यास त्यांचेच हात आपल्यावरती कारवाई करण्यास उचलले जातील व आपल्या वरती गुन्हा दाखल होऊन आपले आयुष्य बरबाद होईल हे एकमेकांच्या धार्मिक भावना दुखवणाऱ्या तरुणांनी ध्यानात ठेवावे. शेवटी खरात यांनी जागतिक सोशल मीडिया दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल लिंक दाबा https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS



