संपादकीय
अवघा महाराष्ट्र कोपरगावकरां कडुन माणुसकीचे धडे घेईल
कोपरगावात सध्या शांताबाई लोंढे चर्चेत आहे.
काही वर्षापूर्वी नृत्य अदाकारीने प्रेक्षकांना भुरळ पाडून तमाशाचा रंगमंच गाजविणाऱ्या शांताबाई लोंढे या वृध्दपकाळामुळे अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे.त्यांनी रसूल पिंजारी वडीतकर, भिका-भीमा सांगवीकर, धोंडू कोंडू सिंधीकर, हरिभाऊ अन्वीकर, शंकरराव कोचुरे खिर्डीकर अशा खानदेशातील नामवंत तमाशा फडात काम केलेले आहे. उत्तर महाराष्ट्र, खानदेशातील अनेक तमाशा फड व मुंबईतील लालबाग परळचे हनुमान थिएटरही त्यांनी गाजवले होते.कोपरगाव मध्ये शांताबाई च्या माध्यमातून माणुसकीचा धडा आपणास पाहावयास मिळत आहे ज्येष्ठ कलावंत शांताबाई लोंढे या अत्यंत वाईट परिस्थितीत जगत असताना त्यांना अनेक ठिकाणाहून मदत मिळत आहे विशेषता काळे कुटुंबीय कोल्हे कुटुंबीय यांच्याकडून ज्येष्ठ कलावंत शांताबाई लोंढे यांना मदत मिळाली आहे त्याचबरोबर सर्वात प्रथम ज्यांनी हे प्रकरण चर्चेत आणले ते अभ्यासु व्यक्तीमत्व असलेले तमाशा कलावंतांच्या वर विविध लेखनीच्या माध्यमातून आवाज उठविणारे अरुण खरात त्याचबरोबर इतरही सामाजिक कार्यकर्ते नागरिकांनी देखील शांताबाई लोंढे यांना मदत केली आहे कोपरगाव शहरांमध्ये ही मदत झाल्यामुळे कोपरगावकरांची माणुसकी यातून दिसून येत आहे. हा मानवतेचा धडा महाराष्ट्रातील अनेक जण घेतील यात शंकाच नाही अनेकांना मानसिक ताण त्याच बरोबर गरिबीमुळे काही वेळा वृध्दपकाळामुळे अथवा अनाथ झाल्यामुळे अशा प्रकारचे जीवन जगण्याची वेळ येते या वेळेत जर कोणी मदत केली तर ती लाख मोलाची मदत ठरते शांताबाई लोंढे यांना केलेली मदतीचा मीडियाने देखील दखल घेतली आहे स्थानिक पातळीवरील मीडिया असेल राज्य पातळीवर मिडीया असेल सर्वच मीडियाने शांताबाई लोंढे यांच्या मदतीची दखल घेतली आहे त्यामुळेच या मदतीचे प्रेरणा अनेकांना मिळेल आणि अनेकांना मदतीचा हात मिळू शकेल कोपरगाव मध्ये शांताबाई लोंढे आपल्या जीवन अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये जगत होती .कोपरगाव शहरातील बस स्थानकामध्ये शांताबाई लोंढे यांचा वावर होता त्या ज्येष्ठ कलावंत होत्या जेष्ठ कलावंतावर अशी वेळ येईल असे वाटत नव्हते . शांताबाई लोंढे यांना जी मदत मिळाली ती नक्कीच शांताबाई लोंढे यांना पुढील जीवन जगण्यासाठी मदत होईल.कोपरगाव मानवतेचे अहमदनगर जिल्ह्यातील केंद्रच म्हणावे लागेल.कोपरगावात वेळोवेळी मानवतेचे दर्शन मिळत असते.कोपरगावातील रिक्षा चालकाचे देखील अनेक उदारणे आहे.रिक्षात प्रवाशाचे पैसे,दागिने,राहिल्यास रिक्षा चालक ते प्रवाशाना देतात अशा घटना देखील कोपरगावात घडल्या आहे.काही दिवसापूर्वी कोपरगावात अनाथ मनोरुग्ण महिलांना सार्वजनिक वर्गणीतुन सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे,आर.टी.जाधव, पत्रकार रविंद्र जगताप,राजेंद्र भवर यांनी माऊली प्रतिष्ठाण येथे भरती करुन त्यांना हक्काचे घर उपलब्ध करुन दिले होते.कोपरगावात अनेक असे मदतीचे उपक्रम झालेले आहे.अनेक उपक्रम चालु देखील आहे.त्यामुळे कोपरगाव मानवतेचे अहमदनगर जिल्ह्यातील केंद्र ठरत आहे
लेखन :- रविंद्र जगताप संपादक :- सत्य एक्सप्रेस
मागील लेख कोपरगावच्या राजकारणात तिसरा पर्याय निर्माण होईल का?ह्या लेखा संदर्भात अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहे.
डोक्यातून जात नाही ती जात सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा
ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल लिंक दाबा https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS




