महाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडीच्या कोपरगाव तालुका महासचिव पदी गौतम बनसोडे यांची निवड

वंचित बहुजन आघाडीच्या कोपरगाव तालुका महासचिव पदी गौतम बनसोडे यांची निवड

संपादक :- रविंद्र जगताप

कोपरगाव शहर व तालुका वंचित बहुजन आघाडीच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारिणीची निवडीची घोषणा कोपरगाव तालुका अध्यक्ष नितीनराव बनसोडे यांनी नुकतीच केली असून त्यामध्ये कोपरगाव तालुका महासचिव पदी गौतम जयसिंगराव बनसोडे यांची निवड केली आहे ही निवड करताना नितीनराव बनसोडे यांनी आपल्या पक्षाच्या नावातील “वंचित” आणि “बहुजन” घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न कोपरगाव शहर व तालुका कार्यकारणी करताना नितीनराव बनसोडे यांनी केला तसेच पक्ष संघटन अधिक बळकट व पक्षाची महत्त्वपूर्ण जबाबदारी यावेळी गौतम बनसोडे यांना देण्यात आली तसेच यावेळी नितीन बनसोडे यांनी नवीन कार्यकारिणीत विश्वासू व निकटवर्ती यांची वर्णी लावली आहे तसेच पक्षाचे वलय अधिक मजबूत होण्यासाठी नवीन कार्यकारणीला अथक परिश्रम घ्यावे लागतील तसेच गौतम बनसोडे यांची कोपरगाव तालुका महासचिव पदी निवड झाल्याबद्दल अनेक मान्यवरांसह मित्र परिवाराने गौतम बनसोडे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या निवडी बद्दल वंचितचे उत्तर महाराष्ट्र संघटक शरद खरात, वंचितचे जिल्हा संघटक बनसोडे यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे