मणिपूर घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे १ आँगस्ट रोजी निषेध करून प्रशासनाला देणार निवेदन
मणिपूर घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे १ आँगस्ट रोजी निषेध करून प्रशासनाला देणार निवेदन
संपादक :- रविंद्र जगताप
कोपरगाव प्रतिनिधी:-मणिपूर राज्यात मैतेइ व कुकी या दोन समुदायात उसळलेल्या हिंसाचारातून दोन कुकी आदिवासी महिलांची नग्न धिंड काढून त्याच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आला व त्यांचे नातेवाईक यांचा खून करण्यात आला. सदर घटना अत्यंत क्रुर व अमानवीय आहे याघटनेचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे कोपरगाव तालुका अध्यक्ष यांनी नुकतीच ऑनलाईन बैठक घेतली आहे या बैठकीमध्ये पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मणिपूर घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी तालुकाध्यक्ष नितीन बनसोडे यांनी या संदर्भात निषेध नोंदविण्यासाठी १ आँगस्ट २०२३ रोजी सहभागी व्हावे असे आव्हान करण्यात आले आहे अशी माहिती कोपरगाव तालुका महासचिव गौतम बनसोडे यांनी दिली आहे
कोपरगाव शहरांमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानामधील दत्त मंदिराजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान असा नावाचा फलक असलेला फलक काही दिवसांपूर्वी काढण्यात आला होता या हा फलक पुन्हा बसविण्यात यावा यासाठी अनेक वेळा निवेदन देण्यात आले होते त्यानंतर हा फलक बसविण्यात आला होता आता सध्या पुन्हा हा फलक कोणी काढला, फलक चोरीला गेला का असा प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहे जर फलक चोरीला गेला असेल तर प्रशासनाने यावर गुन्हा तात्काळ दाखल करण्यात यावा असे दिलेला प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे
वंचितचे कोपरगाव तालुका अध्यक्ष नितिन बनसोडे, ,महासचिव गौतम बनसोडे,सचिव शकील चोपदार, तालुका उपाध्यक्ष अनिल राजेंद्र कांबळे , रतन रामकरण भारती राजेंद्र हनुमंत पगारे व सुरेश भीमराज हुसळे कोपरगाव तालुका संघटक महेंद्र अर्जुन साळवे व बापूसाहेब बाजीराव ठोंबरे , अशोक रामदास सौदागर , विकास साहेबराव लोंढे तालुका सचिव राजेंद्र भाऊराव पगारे सल्लागार दत्तू सखाराम घोडेराव भाऊसाहेब महादू वाकचौरे कोपरगाव शहर अध्यक्ष शुभम साहेबराव शिंदे उपाध्यक्ष कैलास अर्जुन कुऱ्हाडे मुकेश कचरू शिंदे कोपरगाव वंचित बहुजन आघाडीचे युवा आघाडी शहर अध्यक्ष शकील गफूर भाई तांबोळी यांनी आवाहन केले आहे की,१ आँगस्ट २०२३ रोजी मणिपूर घटनेचा निषेध नोदविण्यासाठि वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी फुले शाहु आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते नागरिकांनी डाँ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक कोपरगाव येथे जमा व्हावे.त्यानंतर या निषेध नोदवुन प्रशासनाला निवेदन दिले जाणार आहे.



