गुन्हेगारी

मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे यांच्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजीं बाबत बेताल वक्तव्याचा व मनिपुर राज्यामध्ये आदिवासी महिलेवर झालेला अत्याचाराचा काँग्रेस तर्फे निषेध 

मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे यांच्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजीं बाबत बेताल वक्तव्याचा व मनिपुर राज्यामध्ये आदिवासी महिलेवर झालेला अत्याचाराचा काँग्रेस तर्फे निषेध 
सदर घटनेला मणिपूर  राज्य व केंद्र शासना चा जबर नसल्यामुळेच घडत आहे-  नितीनराव शिंदे
संपादक:- रविंद्र जगताप
 दिनांक ३१/७/२३ रोजी कोपरगावचे तहसीलदार यांना कोपरगाव काँग्रेस कमिटी तर्फे निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे यांच्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजीं बाबत बेताल वक्तव्य व मनिपुर राज्य मध्ये आदिवासी महिलेवर झालेला अत्याचाराबाबत निषेध करण्यात आला. सदर घटनेला राज्य व केंद्र शासनचा जबर नसल्यामुळेच घडत आहे- याप्रसंगी  नितीनराव शिंदे (सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी).म्हणाले आहे
नुकताच मनोहर भिडे यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या बाबतीत केलेले बेताल वक्तव्य संबंधित शासनाने त्यांच्यावर कठोर कार्यवाही करावी. त्यांच्या या वक्तव्यामुळे आम्ही काँग्रेस जण अत्यंत दुःखी झालेलो आहोत. तरी शासनाने याबाबत कठोर निर्णय घेऊन भिडे वर गुन्हा दाखल करावा.तसेच मणिपूर राज्यामध्ये नुकतीच हिंसाचारात महिलेला नग्न केलं गेलं. ही बाब अत्यंत दुःखद घटना आहे. तरी शासनाने कठोर निर्णय घ्यावा व झालेल्या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत.वरील दोन्ही घटनेबाबत शासन स्तरावर कठोर निर्णय घ्यावा. जेणेकरून अशा घटना वारंवार होणार नाहीत.शासन पातळीवर आपण काय निर्णय घेणार आहात ?  याबाबत ची माहिती आम्हाला द्यावी,अन्यथा नजीकच्या काळात आंदोलन केले जाईल,असे निवेदनात म्हटले आहे. सदर निवेदनावर
नितीनराव मनोहर शिंदे.,विजयराव सुधाकर जाधव,छबुराव शिंगाडे,चंद्रकांत बागुल,ज्ञानेश्वर भगत,सोपान धनक. ,श्रीरंग चांदगुडे, सागर बारहाते  ,रौनक अजमेरे,सचिन होन ,राहुल गवळी ,कैलास पंडोरे, राजू भाई पठाण,सादिक अख्तर ,अब्बास भाई पठाण ,टिलुभाई पठाण ,यादवराव त्रिभुवन ,अँड.शितलताई देशमुख ,चंद्रहार जगताप,अनिलराव जग्गी ,राजेंद्र गंगवाल ,महादेव नाना जगताप ,सोळसे मामा ,बाबुराव पवार यांच्या सह्या आहेत
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे