ब्रेकिंग

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नेते दिलीपराव कानडे समाज भुषण पुरस्काराने सन्मानित

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नेते दिलीपराव कानडे समाज भुषण पुरस्काराने सन्मानित

संत रविदास समाजभुषण पुरस्काराने सन्मानित व्यक्तींचा गौरव करतांना विशेष आनंद -आमदार वैभव नाईक यांचे गौरवोद्गार

संपादक :- रविंद्र जगताप

कोपरगाव (प्रतिनिधी)राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे विभागीय अध्यक्ष मा दिलीपराव कानडे यांना चर्मकार समाजाकरीता केलेल्या भरीव कामगिरीची दखल घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा उन्नती मंडळाच्या वतीने देण्यात येणारा मानाचा “संत रविदास समाजभुषण” पुरस्कार सिंधुदुर्ग येथे एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करुन आमदार वैभवजी नाईकसाहेब यांचे शुभहस्ते गौरविण्यात आले सिंधुदुर्ग येथे हा सोहळा संपन्न झाला कार्यक्रमात प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेचे आमदार वैभव नाईकसाहेब यांचे हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली अध्यक्ष पदावरुन बोलतांना आमदार वैभव नाईक यांनी समाज भुषण दिलीपराव कानडे यांच्या सामाजिक कार्याबद्दल कौतुक करतांना विशेष आनंद होत असल्याचे सांगत समाजासाठी अहोरात्र झटणाऱ्या चांगल्या कर्तृत्ववान व्यक्तीच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन संत शिरोमणी गुरु रविदास समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केल्याबद्द्ल सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार उन्नती मंडळाच्या सर्व पदाधिकारी यांचे आभार मानुन चर्मकार समाज आजही अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत असुन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नेते दिलीपराव कानडे यांचे सारखे कार्यकर्ते कुटुंबाची पर्वा न करता समाज्याच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहचत न्याय मिळवून देण्यासाठी व सामाजिक कार्यासाठी लढतात आशा योग्य व्यक्तींना समाज भूषण पुरस्कार देतांना मला मनस्वी आनंद समाधान मिळाल्याचे गौरवोद्गारआमदार वैभव नाईक यांनी काढले


सत्काराला उत्तर देतांना दिलीपराव कानडे यांनी काही आठवणी सांगत शिवसेना उपनेते माजीमंत्री बबनरावजी घोलप नाना यांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर असुन त्यांचा असणारा विश्वास सार्थ ठरवत चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्नशील असतो यापुढेही रात्रंदिवस काम करण्याची ऊर्जा या पुरस्काराने दिल्याचे सांगुन दिलीपराव कानडे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार उन्नती मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले
यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार उन्नती मंडळाचे अध्यक्ष सुजित जाधव,कार्यध्यक्ष विजय चव्हाण,चंद्रसेन पठाडेअँड.अनिल नरवडेकर, रविकिशोर चव्हाण यांचेसह कार्यक्रमात विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी यांनी कानडे यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या यावेळी समाजातील जेष्ठ, युवक ,समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.पुरस्कार मिळाल्याबद्दल राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आमदार भाऊसाहेब कांबळे,आमदार आशुतोष दादा काळे,कार्याध्यक्ष भानुदासजी विसावे मनिषाताई पोटे,रविंद्रजी पाठक ,जिल्हाध्यक्ष अशोकराव कानडे, जिल्हा संपर्क प्रमुख अँड संतोष कांबळे ,युवा जिल्हाध्यक्ष दत्तात्रय दुशिंग तुषारजी पोटे,तालुकाध्यक्ष माधवराव पोटेसर,गणेश कानडे, देविदास कानडे,संजय पोटे,संतोष दळवी, संतोष कानडे, संतोष शिंदे, अँड रमेश दुशिंग आदींनी अभिनंदन केले आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे