ब्रेकिंग

कोपरगाव शहरातील अवैध धंदे बंद करावेत भाजपा अनुसूचित जाती  मोर्चा

कोपरगाव शहरातील अवैध धंदे बंद करावेत भाजपा अनुसूचित जाती  मोर्चा

कोपरगाव शहरात सध्या गावठी दारू, मटका तसेच तत्सम अवैध धंदे जोरात चालत असून सदर धंद्याचा कोपरगाव शहरात अक्षरशः पेव फुटले आहे. तरुण पिढी सदर धंद्याची बळी पडली असून शहरातील अनेक अल्पवयीन तरुण, जेष्ठ नागरीक मटक्याच्या आहारी गेली असून कष्टाने कमवलेला पैसा सदर धंदेवाल्यांच्या घशात घालत आहे. यावर लवकरात लवकर सदर बेकायदेशीर धंद्यावर कार्यवाही करावी

जाहिरात

तसेच सदर बेकायदेशीर धंद्यावर ३-४ दिवसात कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येईल, याची प्रशासनाने दखल घ्यावी.असे निवेदन भाजपा अनुसूचीत जाती मोर्चाचे शहराध्यक्ष संदीप निरभवणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व ग्रामिण  पोलिस स्टॆशनला  देण्यात आले आहे .या निवेदनावर अनिल जाधव तालुकाध्यक्ष, संदिप निरभवणे शहराध्यक्ष, अमोल साळवे तालुका उपाध्यक्ष, सागर घुसाळे ता.सरचिटणीस ,जतिन निरभवणे, सचिन त्रिभुवण. शरद निरभवणे राजेद्र पठारे गणेश खरात आदिंच्या सह्या आहेत

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे