कोळगावथडी येथील घटनेचा माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केला जाहीर निषेध
कोळगावथडी येथील घटनेचा माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी केला जाहीर निषेध
संपादक :- रविंद्र जगताप
कोळगावथडी येथे समाजकंटकाने धार्मिक ग्रंथाची पाने फाडून केलेल्या विटंबनेचा निषेध सकल हिंदू समाजाच्यावतीने कालच करण्यात आला.कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तसे निवेदन देऊन दोषी समाजकंटकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.शासनाने मंदिराप्रमाणेच सर्व मस्जिदी-चर्च व सर्वच धार्मिक स्थानांवर सी.सी.टिव्ही कॅमेरे बसविण्याचा आग्रह धरणे गरजेचे आहे.तरच अशा समाजकंटकांना आळा घालणे शक्य होईल.मे.तहसीलदार व मे.पोलीस निरीक्षक यांनी सर्वधर्मीय-सर्वपक्षीय शांतता समितीच्या एकत्रित बैठका नियमितपणे घेतल्या पाहिजेत.हिंदू धर्मांच्या सण-उत्सवाच्या वेळी केवळ काही हिंदू कार्यकर्ते-संघटना व मुस्लिमांच्या धार्मिक सणांच्यावेळी फक्त काही मुस्लिम कार्यकर्त्यांच्या बैठका स्वतंत्रपणे न घेता शांतता समितीच्या संयुक्त बैठका घ्याव्यात.त्यामुळे हिंदू-मुस्लिम कार्यकर्ते-नेते यांच्यात समन्वय ठेवता येईल व गैरप्रकारांना आळा घालणे सोपे होईल.असे दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात मा.नगराध्यक्ष विजय वहाडणे म्हणाले आहे.




