सामाजिक

कोपरगांव पिपल्स को-ऑप बँक लि. बँकेचा सामाजिक उपक्रम व सामाजिक बांधीलकी

कोपरगांव पिपल्स को-ऑप बँक लि. बँकेचा सामाजिक उपक्रम व सामाजिक बांधीलकी

संपादक:- रविंद्र जगताप

कोपरगांव दि. १५.०८.२०२३ :- कोपरगांव पिपल्स बँकेमध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बँकेच्या इमारतीवर बँकेचे विद्यमान चेअरमन मा. श्री. कैलासचंदजी भागचंदजी ठोळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तदनंतर बँकेने दरवर्षी प्रमाणे सामाजिक उपक्रम व सामाजिक बांधीलकीतुन आयोजित केलेल्या बक्षीस व गणवेश वाटपाचा कार्यक्रम पार पडला. प्रथमत: बँकेचे चेअरमन कैलासचंजी ठोळे यांनी सर्वांचे स्वागत करून बँके विषयी बोलतांना सांगितले की, कोपरगांव पिपल्स को-ऑप बँकेचे अमृत महोत्सव वर्ष चालु असून अमृत महोत्सव वर्षा निमित्त बँक घेऊन आली आहे डिजीटल महोत्सव बँकेने मोबाईल बँकींग, क्यु. आर. कोड, गुगल पे/ फोन पे, नॅच या सारख्या डिजिटल सुविधेचा शुभारंभ केलेला आहे. तरी सर्व खातेदारांनी या सुविधा अधिका अधिक लाभ घ्यावा असे त्यांनी सांगितले.

तसेच बँक गेल्या अनेक वर्षापासुन राबवित असलेल्या सामाजीक कार्याबद्दल पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांना संबोधीत करतांना त्यांनी सांगितले की, कोविड महामारीच्या वेळेस बँकेने पी.पी. किट, हॅण्ड सॅनिटायझर, मास्क या सारख्या वस्तुचे वाटप केले तसेच बँक व बँकेचे मा. संचालक मंडळ हे समाजाचा एक घटक म्हणुन नेहमी कार्यरत असतात असे सांगितले.त्यानंतर कोपरगावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच कोपरगांव शहरातील व परिसरातील एकुण २५ शाळांमधील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व शालेय उपयोगी वस्तुमध्ये ब्ल्यूटुथ स्पिकर, म्युझीक सिस्टीम, इन्व्हर्टर मशिन, सतरंज्या, लेझीम, पाण्याची टाकी, कपाट, टेबल खुर्ची, माईक स्पिकर व थोर नेत्यांच्या फोटो फ्रेम वाटपांचा कार्यक्रम पार पडला. यावेळी के.जे. सोमैय्या व एस. एस. जी. एम. या महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखे मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बँकेचे संचालक व अधिकारी यांच्या हस्ते बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच कोपरगांव शहरातील के.बी.पी. माध्यमिक विद्यालय, एस. जी. विद्यालय, सेवानिकेतन विद्यालय, कन्या विद्या मंदीर, शारदा इंग्लीश मेडियम स्कुल, विश्वात्मक जंगली महाराज गुरूकुल व इतर सर्व माध्यमीक विद्यालयातील १० वी व १२ मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच बँकेच्या सेवकांच्या पाल्यांनी विविध क्षेत्रात मिळविलेल्या यशा बद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला. शहरातील सर्व माध्यमीक व प्राथमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थी व विद्यार्थीनीना गणवेशाचे वाटप व शालेय उपयोगी वस्तु संचालक व सेवक वर्गाचे हस्ते देण्यात येऊन सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.यावेळी व्हा. चेअरमन भाऊसाहेब लोहकरे व संचालक सर्व श्री. कल्पेश शहा, सुनिल बंब, रविंद्र ठोळे, हेमंत बोरावके, सुनिल बोरा व संचालीका सौ. त्रिशला गंगवाल, सौ. प्रतिभा शिलेदार इत्यादी उपस्थित होते. तसेच शहरातील सर्व शाळेतील शिक्षक, पालक, विद्यार्थी व बँकेचे सेवक वर्ग मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बँकेचे असि. जन. मॅनेजर जितेंद्र छाजेड यांनी केले. बँकेच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे