महाराष्ट्र

श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे दैदिप्यमान व्यक्तिमत्व सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांसाठी अखंड प्रेरणास्रोत

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतांना ना.आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी  :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज ज्या भूमीत जन्माला आले त्या पवित्र भूमीत आपण देखील जन्माला आलो याचा प्रत्येकाने अभिमान बाळगला पाहिजे आणि आपल्या नसनसात आणि डोक्यात नेहमीच शिवविचार असले पाहिजे. महाराजांची ध्येय धोरणे आजही आदर्शवत आहेत. अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेवून हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवरायांनी लोककल्याणकारी व मानवतावादी धोरण कायमस्वरूपी जोपासले. माणूस धर्मासाठी नसून धर्म माणसासाठी आहे याचे प्रत्यक्ष आचरण करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे दैदिप्यमान व्यक्तिमत्व सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांसाठी अखंड प्रेरणास्रोत असल्याचे प्रतिपादन श्री.साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी केले.

  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्यास ना.आशुतोष काळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्री संत जनार्दन स्वामी आश्रमाचे ह.भ.प. परम पुज्य रमेशगिरिजी महाराज व ना.आशुतोष काळे यांच्या हस्ते महाराजांचे विधिवत पूजन व महाआरती करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधत सालाबादप्रमाणे याहीवर्षी सेवा फौंडेशन कोपरगाव यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरास ना.आशुतोष काळे यांनी भेट देऊन रक्तदान शिबीर आयोजित केल्याबद्दल सेवा फौंडेशनच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. रक्तदात्यांना ना.आशुतोष काळे यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूलेशिवसेना शहराध्यक्ष कलविंदरसिंग डडीयाल, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, शहराध्यक्ष सुनील साळुंके, नगरसेवक गटनेते विरेन बोरावकेमंदार पहाडे,संदीप पगारेसौ.प्रतिभा शिलेदारअजीज शेख,गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदारराष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष नवाज कुरेशीरेखा जगताप,राष्ट्रवादी युवती तालुकाध्यक्षा सौ.वैशाली आभाळेमायादेवी खरेरमेश गवळीफकीर कुरेशीदिनकर खरेप्रफुल्ल शिंगाडेविद्यार्थी तालुकाध्यक्ष निखील डांगेशहराध्यक्ष कार्तिक सरदारराहुल देवळालीकरडॉ.तुषार गलांडे,जावेद शेखचंद्रशेखर म्हस्केरावसाहेब साठे,प्रकाश दुशिंगराजेंद्र वाकचौरेबाळासाहेब रुईकरअशोक आव्हाटेवाल्मिक लहिरे,धनंजय कहारऋषिकेश खैरनारआकाश डागासुनील बोराशुभम लासुरेकिरण बागुल,भाऊसाहेब भाबडकुलदीप लवांडेराजेंद्र आभाळेअंबादास वडांगळेहारूण शेखमहेश उदावंततेजस साबळेबिलाल पठाणसलिम पठाणमुकुंद इंगळेनारायण लांडगेप्रदीप कुऱ्हाडेरवींद्र राऊतयोगेश वाणीइम्तियाज अत्तारअमोल गिरमेयोगेश नरोडेमनोज कडू,पुंडलिक वायखिंडेजनार्दन शिंदेप्रसाद रुईकर,किरण शहानिलेश पाखरेविकि जोशीसंदीप देवळालीकरअमोल आढावअक्षय आंग्रे,शिवाजी लकारेसागर विदुरनितीन साबळे,गणेश बोरुडेएकनाथ गंगूलेगणेश लिंभुरे,संतोष शेलारकुंदन वाघमारेराहुल आदमाणे,निलेश उदावंतमनोज राठोडचांदभाई पठाण,रवींद्र देवरेसंतोष शेजवळविशाल साबदे,राहुल देशपांडेविजय जाधवचंद्रभान बागुल,ऋषिकेश पगारे, चंद्रहार जगताप, सुरामा पांडे,छाया फरताळेभाग्यश्री बोरुडेशितल वायखिंडेदिक्षा उनवणेरुपाली कळसकर,शितल लोंढेसेवा फाउंडेशनचे जुनेद शेख,हाफिज शेखइरफान तांबोळीमतीन चोपदार,आसिफ मणियारफिरोज पठाणभूमिपुत्र फाउंडेशनचे निसार शेखअकबर शेखइम्रान सय्यदअन्सार शेखअॅड.नितीन पोळजाकीर शेखआसिफ पठाणआरिफ पठाण आदींसह नागरिक उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे