धार्मिक

ह.भ. प.श्री. बाळकृष्ण महाराज सुरासे यांच्यामुळे कोपरगाव चे नाव महाराष्ट्राभर.:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

ह.भ. प.श्री. बाळकृष्ण महाराज सुरासे यांच्यामुळे कोपरगाव चे नाव महाराष्ट्राभर.:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, श्रध्दास्थान पंढरपूर आहे.पंढरपूर दरवर्षी भाविक मोठ्या श्रध्दने जात असतात.आज दोन एस टी महामंडळाच्या बस भरून भाविक कोपरगावहून पंढरपूरला ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यासाठी रवाना झाले. या बसचे पूजन व श्रीफळ वाढवून माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या हस्ते गाड्यांनी प्रस्थान केले.भागवतरसज्ञ, साई कथाकार ह भ प श्री बाळकृष्ण महाराज सुरासे यांच्या मधुर वाणीतून या भव्य ग्रंथराज श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळ्याचे श्रीक्षेत्र पंढरपूरात आयोजन करण्यात आलं आहे. जवळजवळ शंभर महिला व पुरुष कोपरगावातून ८ दिवसाच्यासाठी सहभागी झाले आहेत.वर्षभर श्री बाळकृष्ण महाराज यांच्या वाणीतून नगर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये महाराजांचे प्रवचने सतत चालू असतात. या कार्यक्रमाचे नियोजन तांबट साहेब व त्यांचे सर्व भजनी मंडळ करतात. यावेळी सर्व खर्च भोजनाचा श्री बन्सीभाऊ मोरे व इतर दानशूरांनी उचलला आहे.कोपरगावातील भक्तांसाठी ही एक पर्वणीच असते.सुरासे महाराजांसोबत ,ह भ प भाऊसाहेब महाराज नाईक , ह भ प भाऊसाहेब महाराज जाधव , ह भ प अशोक महाराज नाईक , ह भ प कैलास महाराज जाधव , हरिदास महाराज ढगारे , ह भ प विलास महाराज नाईक , ह भ प रामेश्वर महाराज जाधव , ह भ प दत्ता महाराज जेजुरकर , ह भ प बाळासाहेब महाराज कुळधरण सर ही देखील महाराज मंडळी आहे.दोन्ही बसचे वाहन चालक यांचे यावेळी सत्कार करण्यात आला.यावेळी बन्सी भाऊ मोरे , फोटोग्राफर हेमचंद्र भवर , संतोष भाऊ सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर
 सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल
 लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे