ज्यांना निवडून दिले ते नाँट रीचेबल झाले, पंधरा वर्षात जो विकास झाला नाही तो विकास करण्यासाठी शिर्डी लोकसभा निवडणूक लढविणार राजेंद्र वाघमारे
ज्यांना निवडून दिले ते नाँट रीचेबल झाले, पंधरा वर्षात जो विकास झाला नाही तो विकास करण्यासाठी शिर्डी लोकसभा निवडणूक लढविणार राजेंद्र वाघमारे
संपादक :- रविंद्र जगताप
शिर्डी लोकसभा मतदार संघात मोठ्या घडामोडी होत असून नुकतेच माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. पूर्वी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे शिवसेनेतून खासदार झाले होते त्यानंतर त्यांनी पक्ष बदलला त्यामुळे शिवसैनिकांमध्ये रोष निर्माण झाला होता त्यांनी पुन्हा एकदा शिवबंधन हाती घेतले असून त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे शिर्डी मतदार संघाची निवडणूक आता सोपी राहिली नाही याच मतदारसंघामधून शिवसेनेचे शिंदे गटाचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडेही आहे.यानंतर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे असून त्यांनी ठाकरे गटांमध्ये प्रवेश केला आहे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे सुद्धा इच्छुक म्हणून निवडणूक लढविणार आहे परंतु आता काँग्रेस मधूनच मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसने निवडणूक शिर्डी लोकसभा लढवावी यासाठी काँग्रेस मधून दबाव निर्माण करण्यात येत आहे .महाविकास आघाडी झाल्यानंतर शिर्डी लोकसभेची जागा कोणासाठी जाणार हाच आता प्रश्न निर्माण झाला आहे .शिर्डी मतदार संघामध्ये काँग्रेसने ही जागा लढवावी यासाठी मोठा दबाव आता निर्माण झाला आहे काँग्रेस मधून राजेंद्र वाघमारे यांची मोठ्या प्रमाणात मोर्चे बांधणी चालू आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून राजेंद्र वाघमारे शिर्डी लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत आहे . विविध सामाजिक कामात सहभाग नोंदवून त्याचबरोबर विविध धार्मिक ठिकाणी सुद्धा त्यांच्या भेटीगाठी जोरदार चालू आहे. शिर्डी मतदार संघामध्ये राजेंद्र वाघमारे यांचा दबदबा वाढत असून काँग्रेस मधून त्यांनी निवडणूक लढावी यासाठी पदाधिकारी यांनी सुद्धा काँग्रेसकडून मागणी करताना दिसून येत आहे .शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडी मध्ये जागा शिवसेना लढविणार का ? काँग्रेस लढविणार येणारा काळच ठरवणार परंतु राजेंद्र वाघमारे यांची जोरदार चर्चा मात्र यावेळी दिसत आहे त्यांची जोरदार मोर्चे बांधणी ,संपर्क शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये चालू आहे नुकतीच कोपरगाव या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन करून त्यांनी शिर्डी लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहिर केले आहे त्यांनी सांगितले की, गेल्या पंधरा वर्षांमध्ये जो शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा विकास झाला नाही, तो विकास करण्यासाठी मी निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिर्डी लोकसभेची जागा काँग्रेसला मिळणार आहे.कारण या मतदार संघात काँग्रेसची लाट आहे.त्याचबरोबर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांची उमेदवारीची मागणी पक्षश्रेष्ठीकडे केली आहे. राजेंद्र वाघमारे हे अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये काम करत आहे काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.



