१ सप्टेंबर रोजी राहुरी जन आक्रोश सभेसाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे:- नितिन बनसोडे

मुस्लिम धर्मग्रंथाची विटंबना प्रकरणी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने कोपरगाव तहसीलदार यांची घेतली भेट आरोपीला त्वरित अटक करावी केली मागणी
१ सप्टेंबर रोजी राहुरी जन आक्रोश सभेसाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे:- नितिन बनसोडे
कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथे मुस्लिम समाजाच्या पवित्र कुराणची विटंबना करणाऱ्या आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना अटक करावी यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतिने डाँ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथून मोर्चा काढत नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांना निवेदन दिले होते. अद्यापही आरोपी मोकाटच असून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार संदीप कुमार भोसले यांची भेट घेऊन लवकरात लवकर आरोपीला अटक करून कोपरगाव मध्ये शांतता प्रस्थापित करावी यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भेट घेतली आहे यावेळी कोपरगाव तालुका अध्यक्ष नितीन राव बनसोडे महासचिव गौतम बनसोडे उत्तर महाराष्ट्र संघटक शरद खरात जिल्हा अध्यक्ष विशाल कोळगे तालुका सचिव गोरख चोपदार शहर अध्यक्ष शकील तांबोळी वंचित बहुजन आघाडी युवा अध्यक्ष शुभम शिंदे फिरोज पठाण नाझीम शेख रहेमान कुरेशी अल्ताफ कुरेशी सद्दाम हाजी तोसीब मणियार गफूर तांबोळी आदी यावेळी उपस्थित होते. त्याचबरोबर १ सप्टेंबर 2023 रोजी राहुरी या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जन आक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले आहे या जनआक्रोश सभेसाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे कोपरगाव तालुका अध्यक्ष नितीनराव बनसोडे यांनी केले आहे




