ब्रेकिंग

कोपरगाव मतदार संघ विकासात जिल्ह्यात अग्रेसर राहील -आ.आशुतोष काळे

कोपरगाव मतदार संघ विकासात जिल्ह्यात अग्रेसर राहील -आ.आशुतोष काळे

कोपरगाव :- मतदार संघातील जनतेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे निधी मिळविण्यासाठी प्रेरणा मिळत असून आजपर्यंत २१०० कोटीच्या वर निधी मतदार संघाच्या विकासासाठी आणला आहे. कोपरगाव विधानसभा मतदार संघ विकासाच्या बाबतीत जिल्ह्यात अग्रेसर राहावा यासाठी प्रयत्नशील असून तुमचे आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी ठेवा कोपरगाव मतदार संघ विकासाच्या बाबतीत जिल्ह्यात अग्रेसर राहील अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे एका कार्यक्रमात बोलतांना दिली आहे.

 

कोपरगाव मतदार संघातील चांदेकसारे येथील ४० लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या एंडकी नाला रस्ता व गोरक्षनाथ रस्ता या दोन्ही रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले कि, मतदार संघातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मतदार संघातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी नागरिकांना अपेक्षित असलेल्या विकास कामांसाठी निधी दिल्यामुळे रस्ते, पाणी, आरोग्य अशा विविध समस्या सुटल्या आहेत. आपण दिलेल्या आशीर्वादातून मतदार संघासाठी २१०० कोटी निधी आणला असून हजारो कोटीचे प्रस्ताव मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. त्यामुळे येत्या काळात मतदार संघासाठी अजून निधी मिळणार असून मतदार संघातील सर्वच विकास कामे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे येत्या काळात विकासाचे बहुतांशी प्रश्न सुटलेले असतील असा त्यांनी व्यक्त विश्वास व्यक्त केला. चांदेकसारे व सोनेवाडीच्या नागरिकांची मागील अनेक वर्षापासूनची मागणी आ. आशुतोष काळे यांनी पूर्ण करून या दोन्ही रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामास प्रारंभ झाल्यामुळे चांदेकसारे व सोनेवाडीच्या नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.यावेळी आनंदराव चव्हाणकर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाणराहुल रोहमारेगंगाधर औताडेमाजी संचालक सचिन रोहमारेपद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब पतसंस्थेचे चेअरमन देवेन रोहमारेगौतम बँकेचे व्हा.चेअरमन बापुराव जावळेरोहिदास होनसरपंच किरण होनउपसरपंच सचिन होननंदकिशोर औताडेसुनील माळीपोपट होनअशोक होनकिशोर होनकेशव जावळेकिशोर ढमालेविलास चव्हाणजालिंदर होनलक्ष्मीकांत होनपुंजाभाऊ होनतुळशीदास होनरामजी ढमालेद्वारकानाथ होनधीरज बोरावकेशंकरराव गुरसळदौलत गुरसळबबलू सय्यदबाळासाहेब खंडिझोडहसन सय्यदताजुभाई सय्यदमनोज होनहरिभाऊ जावळेसोपान गुडघेकाशिनाथ होन,कर्णासाहेब चव्हाणमलू होनद्वारकानाथ होनदादासाहेब होनमच्छिन्द्र होनआप्पासाहेब होनदौलतराव होनसुनील होनगंगाधर खोमणेशंकरराव जावळेअण्णा गाढेसंदीप पवारराजकिशोर जाधवकिसन काटकरशरद होनसतीष पवारनारायण होनअनिल बावकेदादासाहेब जावळेसंजय गुजरभगवान होनआबा दहेनिरंजन जावळेशिवाजी जावळेकिरण पवारकिरण होनराहुल होनभिवराव दहेभाऊसाहेब होनभास्कर होनरावसाहेब होनबापू होनप्रभाकर होनचंद्रकांत होनपंकज होनरविंद्र खरातकांतीलाल होनकिरण अर्जुन होनरावसाहेब होननुरमहम्मद शेखमधुकर खरातडॉ. घोंगडेराजु होनमाऊली पवारसार्वजनिक बांधकाम विभागाचे चौधरीग्रामसेवक भैरवनाथ नाडेकरउमेश कोल्हे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे