ब्रेकिंग

अनेक वर्षापासून एम. एम. क्यू .आर. ए या समन्याय पाणी वाटप मंडळाचे अध्यक्ष पद हे रिक्त असल्यामुळे कुठे ही पाणी सोडण्याच्या संदर्भात निर्णय घेऊ नये.,:- नितिन शिंदे

अनेक वर्षापासून एम. एम. क्यू .आर. ए या समन्याय पाणी वाटप मंडळाचे अध्यक्ष पद हे रिक्त असल्यामुळे कुठे ही पाणी सोडण्याच्या संदर्भात निर्णय घेऊ नये.,:- नितिन शिंदे
संपादक;- रविंद्र जगताप

नुकतीच छ.संभाजीनगर (औरंगाबाद) जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडावे यासाठी जायकवाडी कालवा समितीची बैठक झाली. आज जायकवाडी धरणामध्ये सध्या 33 टक्के म्हणजेच ७२८ द.ल.घ.म. जिवंत पाणी साठा उपलब्ध आहे. यामध्ये संपूर्ण वजावट होऊन २०२ म.म.क्यु. पाणी खरीप हंगामातील शेतीसाठी उपलब्ध होऊ शकेल. १ सप्टेंबर पासून रोटेशन चालू करावं अशी मागणी सदर बैठकी मध्ये करण्यात आली . हे रोटेशन सोडल्यास २१ दिवस पाणी सतत चालू राहील व १८० एम एम क्यू पाणी वापरले जाईल.सध्याच्या एम एम क्यू आर ए च्या कायद्यानुसार ११अनव्ये सी प्रमाणे १५ ऑक्टोबर जी स्थिती असते, त्या स्थितीनुसार वरच्या धरणातील पाणी सोडण्याची तरतूद आहे.अहमदनगर व नासिक जिल्हा तील आजची धरणातील पाणी स्थिती निळवंडे ,भंडारदरा ,नांदूर मधमेश्वर १०० %, पुणेगांव, दारणा, मुकणे, वाकी, भाम,भावली , वालदेवी साधारण ६० ते ७० टक्के आहे. ही परिस्थिती मुंबईकडून येणाऱ्या मान्सून वाऱ्यामुळे आहे. हा पाऊस आपल्याला साधारण सप्टेंबर महिन्यात शेवटपर्यंत असतो.

सध्या अनेक वर्षापासून एम. एम. क्यू .आर. ए या समन्याय पाणी वाटप मंडळाचे अध्यक्ष पद हे रिक्त असल्यामुळे कुठे ही पाण्यात सोडण्याच्या संदर्भात निर्णय घेऊ नये. कारण परतीचे जे पाऊस सुरू होणे बाकी आहे व ते पूर्वेकडून येणारे असतात,त्या पावसाने काही दिवसातच जायकवाडी भरेल. परंतु जर अहमदनगर नाशिक जिल्ह्यातील या स्थितीत जर धरणांचे पाणी सोडले तर धरणं रिकामं होऊन जातील व फक्त जायकवाडी धरणात चं पाणी शिल्लक राहिल व भौगोलिक परिस्थितीमुळे जायकवाडीचे पाणी नाशिक नगर व वैजापूर वरील भागात देणे अशक्यच आहे. म्हणून सध्या एम एम क्यू आर ए चे रिक्त अध्यक्ष पद असे पर्यंत कुठलाही घातक निर्णय घेऊन वरील भागावर अन्याय करू नये. राज्य सरकारने पाणी सोडण्याचा घातक निर्णय घेतल्यास सदर सोडलेल्या पाण्यामध्ये गोदावरी नदीच्या पात्रात असंख्य शेतकऱ्यांसह काँग्रेसजन जल समाधी घेतील असा इशारा मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री,विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य यांना असे निवेदन देण्यात आला.सदर निवेदन ई- मेल द्वारे व प्रत्यक्ष तहसीलदार यांना देण्यात आले त्यावेळी नितीनराव शिंदे, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, तुषार पोटे शहर अध्यक्ष, कोपरगाव, सुनील साळुंखे, विजयराव जाधव, छबुराव शिंगाडे, चंद्रकांत बागुल, स्वरूप अशोक खांबेकर, अँड. शितलताई देशमुख, शब्बीरभाई, यादवराव त्रिभुवन व इतर अनेक उपस्थित होते.
जाहिरात

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा.

https://chat.whatsapp.com/KgmXrffhj0F6D04zF6eSoo

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास माहिती नाही,महाराष्ट्रात राहता का पाकिस्तानात, सविस्तर माहितीसाठी खालील लिंक दाबा

https://youtu.be/q1DvsD63HTY?si=IdUm4wcqflLWVXWO

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे