आमदार आशुतोष काळेंच्या पाठपुराव्याला यश २०९५ शेतकऱ्यांना मिळणार लवकरच ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान
आमदार आशुतोष काळेंच्या पाठपुराव्याला यश
२०९५ शेतकऱ्यांना मिळणार लवकरच ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान
कोपरगाव प्रतिनिधी – प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित असलेल्या सहा हजार शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांना यश आले असून शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी २०९५ शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या शेतकऱ्यांना लवकरच ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहेमहाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेवून नियमितंकर्ज फेड करणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले सन्मान योजना योजना जाहीर करून या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ५० हजार रुपये देण्याचे जाहीर केले होते. त्या निर्णयाची अंमबजावणी होवून १ हजार ३२३ शेतकऱ्यांना हे अनुदान यापूर्वीच मिळाले होते. मात्र जवळपास ६००० शेतकरी या प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित होते. त्यासाठी आ.आशुतोष काळे यांचा शासनदरबारी पाठपुरावा सुरू होता. त्या पाठपुराव्याची शासनाने दखल घेवून २०९५ पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी शेतकऱ्याच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.यामध्ये १६९७ जिल्हा बँकेचे व ३९८ इतर शेतकऱ्यांचे राष्ट्रीयकृत बँकेचे आधार प्रमाणीकरण करण्यात येणार आहे.ही प्रिक्रिया पूर्ण होताच या २०९५ लाभधारक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५० हजार रुपये अनुदान जमा होणार आहे.त्यामुळे प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून या शेतकऱ्यांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.उर्वरित शेतकऱ्यांना देखील लवकरात लवकर अनुदान मिळावे यासाठी पाठपुरावा सुरूच असून त्यांना सुद्धा लवकरच अनुदान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.



सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/GH2PJbfhhcw32Mfy0oRS1y
इकडे लग्न उरकताच नवरदेव नवरीसह पोहचला मतदान करायला सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा
