सामाजिक

२०२४ ला कोपरगाव शहराला नियमित पाणी पुरवठा होईल -आ.आशुतोष काळे

सामाजिक सभागृहाचे भूमीपूजन व गुणवंत विद्यार्थी व विविध क्षेत्रातील समाज बांधवांच्या सत्कार सोहळ्या प्रसंगी आ. आशुतोष काळे व मान्यवर.

२०२४ ला कोपरगाव शहराला नियमित पाणी पुरवठा होईल -आ.आशुतोष काळे

संपादक:- रविंद्र जगताप

कोपरगाव प्रतिनिधी  :- मतदार संघातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांना न्याय देवून सर्वधर्मसमभाव जोपासतांना इतर समाजाप्रमाणे ब्राम्हण समाजाला देखील न्याय देवून न मागता देखील सामाजिक सभागृहासाठी निधी दिला असून अजूनही निधी देण्यासाठी प्रयत्न करू. मला दिलेल्या संधीतून विकासाची कामे सुरु असून अत्यंत महत्वाचा असलेला पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी १३१.२४ कोटी निधीतून ५ नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच हे काम पूर्ण होवून २०२४ ला निश्चितपणे कोपरगाव शहराला नियमित पाणी पुरवठा होईल असा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.

जाहिरात

कोपरगाव शहरातील श्रीरामनगर येथे आ. आशुतोष काळे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत १० लक्ष रुपये निधीतून ब्राह्मण समाजासाठी बांधण्यात येणाऱ्या सामाजिक सभागृहाचे भूमीपूजन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी १० वी, १२ वी, पदविका व पदवी अभ्यासक्रमात विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा व विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या समाज बांधवांचा आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले की, पूर्वीपासून ब्राम्हण समाज विद्वान समजला जातो त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात ब्राम्हण समाजातील व्यक्ती उच्च पदावर कार्यकर्त आहे हि अभिमानास्पद बाब आहे. काळे परिवाराचे इतर समाजाप्रमाणेच ब्राम्हण समाजाशी जिव्हाळ्याचे सबंध आहेत. कोपरगाव शहरात शासकीय इमारती, विविध रस्ते, शहर सुशोभीकरण अशी बहुतांशी विविध विकास कामे पूर्ण झाली असून अनेक विकास कामे सुरु आहेत. निवडणूक प्रचारावेळी शहरातील नागरिकांच्या घरासमोरील पाण्याच्या असंख्य टाक्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा निश्चय केला होता. केलेला निश्चय पूर्ण होवून मागील अनेक वर्षापासूनचा ज्वलंत पाणी प्रश्न येत्या काही दिवसात कायमचा सुटणार असून त्यामुळे मला माता भगिनींचे आशीर्वाद मिळाले याचे मोठे समाधान वाटते. विविध विकासकामे पूर्ण करून नागरिकांचे जीवन कसे सुखकर होईल यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले.

आ. आशुतोष काळे तुम्ही पुन्हा येणार——-

-ब्राह्मण समाजाच्या सामाजिक सभागृहासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी निधी दिला मात्र आम्हाला तुम्ही न मागता वेळेवर निधी दिला त्यामुळे तुमचा निधी आमच्यासाठी विशेष आहे. मी पुन्हा येणार हे वाक्य ब्राम्हण समाजात मोठे प्रचलित आहे.आ.आशुतोष काळे यांनी केलेली विकास कामे पाहता मी पुन्हा येणार हे वाक्य त्यांना साजेसे आहे. आ. आशुतोष काळे करीत असलेले काम प्रत्येक क्षेत्रात असून तुम्ही पुन्हा येणार याची संपूर्ण मतदार संघ ग्वाही देत आहे.- उद्योजक प्रसाद नाईक

यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, ब्राह्मण सभा कोपरगावचे अध्यक्ष मकरंद कोऱ्हाळकर, उपाध्यक्ष गोविंद जवाद, अॅड.जयंत जोशी, बाळकृष्ण कुलकर्णी, सचिव सचिन महाजन, संदीप देशपांडे, सदस्य जयंत बडवे, योगेश कुलकर्णी, महेंद्र कुलकर्णी, गौरीश लहूरकर, सुधाकर कुलकर्णी, माजी नगराध्यक्षा सौ.ऐश्वर्या सातभाई, प्रसाद नाईक, वसंतराव ठोंबरे, संजीव देशपांडे, डॉ. मिलिंद धारणगावकर, अनिल कुलकर्णी, अॅड. श्रद्धा जवाद, सौ. वंदना चिकटे, अजिंक्य पदे, सदाशिव कुलकर्णी, सुभाष महाजन, प्रसाद नाईक आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, सौ. प्रतिभा शिलेदार, दिनकर खरे, राजेंद्र वाकचौरे, गौतम बँकेचे माजी संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, डॉ. तुषार गलांडे, वाल्मिक लहिरे, राजेंद्र खैरनार, ऋषीकेश खैरनार, अॅड. मनोज कडू, प्रकाश रुईकर, नारायण लांडगे, विकी जोशी, समाज बांधव, गुणवंत विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे