ब्रेकिंग

के.जे.सोमैया महाविद्यालयात ‘डोळ्यांची काळजी’ विषयावर व्याख्यान संपन्न 

के.जे.सोमैया महाविद्यालयात ‘डोळ्यांची काळजी’ विषयावर व्याख्यान संपन्न 

संपादक:- रविंद्र जगताप

कोपरगाव: स्थानिक के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात स्टुडेन्ट मेंटोरिंग प्रोग्राम व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘डोळ्यांची काळजी’  या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. या व्याख्यान सत्रासाठी कोपरगाव शहरातील प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. सोनल वाबळे यांना आमंत्रित करण्यात आले होते. सध्या डोळ्यांच्या आजारांची साथ मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.सोनल वाबळे यांनी मानवी जीवनात डोळ्याचे महत्व विषद करतांना साथीच्या आजारापासून डोळ्यांची निगा कशी राखावी यावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच डोळे निरोगी राहण्यासाठी सकस आहार व व्यायामाबरोबरच मोबाईल व इतर सोशल मीडियापासून विद्यार्थ्यांनी दूर राहिले पाहिजे. उद्याचा सुदृढ व सशक्त भारत निर्माण करण्याची ताकत विद्यार्थ्यांमध्ये असल्याने सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे प्रतिपादन ही त्यांनी यावेळी केले. अध्यक्षीय समारोपात आदरणीय सौ. शोभाताई रोहमारे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी हितगुज साधतांनाच डॉक्टरांनी दिलेल्या अनमोल मार्गदर्शनाचा आपल्या जीवनात अंगीकार करावा व डोळ्यांची तसेच आरोग्याची काळजी घ्यावी असे आव्हानही केले. या आरोग्य सत्राच्या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, विश्वस्त मा. संदिपराव रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो.(डॉ) विजय ठाणगे यांनी महाविद्यालयात राबवित असलेल्या विद्यार्थी केंद्रित अनेक योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वर्षा आहेर यांनी तर आभार प्रदर्शन स्टुडेन्ट मेंटोरिग प्रोग्राम चे समन्वयक डॉ. रवींद्र जाधव यांनी केले. याप्रसंगी प्रो.(डॉ) संतोष पगारे, डॉ.सुरेखा भिंगारदिवे, प्रा. रोहन यादव, प्रा. मुकेश माळवदे, प्रा. अजित धनवटे, प्रा. सोनाली आव्हाड, प्रा. स्वागत रणधीर यांच्यासह महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे