महाराष्ट्र

शेततळ्यातील मत्स्य शेती फायद्याची-विवेकभैय्या कोल्हे

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय (तांत्रिक) अहमदनगर व मत्स्य विज्ञान महाविद्यालय उदगीर (लातुर) यांच्या सहकार्याने कारखाना कार्यस्थळावर मत्स्य संवर्धन शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यांत आले होते त्यात अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी सभासद शेतकऱ्यांना मत्स्य पालना विषयी माहिती दिली.
शेततळ्यातील मत्स्य शेती फायद्याची-विवेकभैय्या कोल्हे
संपादक:-रविंद्र जगताप
कोपरगाव :-  माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सभासद शेतक-यांची आर्थीक क्रयशक्ती वाढावी त्याचबरोबर शेतीला पुरक व्यवसाय निर्माण व्हावे म्हणून परिसरात दुग्ध, कुक्कुट, मत्स्य, शेळी-मेंढीपालन यासारखे जोडधंदे सुरू करून शाश्वत उत्पन्नाचे मार्ग निर्माण केले, शेतक-यांनी शेततळयातील मत्स्य पालनावर भर देवुन जास्तीत जास्त सहभाग घ्यावा मत्स्य शेती फायद्याची ठरते असे प्रतिपादन राज्य सहकारी साखर संघाचे संचालक व कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय (तांत्रिक) अहमदनगर व मत्स्य विज्ञान महाविद्यालय उदगीर (लातुर) यांच्या सहकार्याने कारखाना कार्यस्थळावर मत्स्य संवर्धन शेतकरी मेळाव्याचे मंगळवारी आयोजन करण्यांत आले होते त्याचे उदघाटन करतांना अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
जाहिरात
जाहिरात
प्रारंभी कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी प्रास्तविकात सभासद शेतक-यांच्या फायद्यासाठी कारखाना व्यवस्थापनाने केलेल्या विविध उपक्रमासह राज्य व राष्ट्रीय स्तरावरील मत्स्य व्यवसाय धोरणाबाबत माहिती दिली. संचालक सर्वश्री. विश्वासराव महाले, बाळासाहेब वक्ते, सतिष आव्हाड, बापूसाहेब बारहाते, ज्ञानदेवराव औताडे, राजेंद्र भाकरे, डॉ. गुलाबराव वरकड, संजीवनी मत्स्य संस्थेचे कारभारी नथू लभडे, सहकाररत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघाचे उपाध्यक्ष बाजीराव मांजरे, संभाजीराव गावंड आदिंच्या हस्ते मस्त्य व्यवसाय अहमदनगरचे प्रभारी सहाय्यक आयुक्त संतोष देसाई, सहाय्यक प्रतिक्षा पाटकर यांचा संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने सत्कार करण्यांत आला. साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.  प्रभारी सहाय्यक आयुक्त संतोष देसाई मत्स्य शेती विषयी माहिती देतांना म्हणाले की, शेतीला जोडधंदा म्हणून या व्यवसायाकडे पाहिले जाते. नगर जिल्हयात बहुतांष शेतक-यांनी शेततळी मोठया प्रमाणांत उभारली आहेत. त्यात मत्स्यबीज सोडुन तंत्रशुध्द पध्दतीने मार्गदर्शन घेवुन कमी खर्चात जादा उत्पादन देणारी मत्स्य शेती करावी त्यासाठीचे सर्व सहकार्य देउ, मत्स्य विज्ञान महाविद्यालय उदगीर (लातुर) चे डॉ. अजय कुलकर्णी, प्रा. संतोष कुंजीर, डॉ. अविनाश मरकड, डॉ सोमनाथ यादव यांनी कटला, रोहु, मृगळ, सायप्रिनस, गवत्या, सिल्वर कार्प आदि मत्स्य जाती व शेतीबाबत दुरदृष्यप्रणालीच्या सहाय्याने शेतक-यांशी संवाद साधत त्यांच्या विविध शंकांचे निरसन केले. सुत्रसंचलन उस विकास अधिकारी शिवाजीराव देवकर तर उस व्यवस्थापक गोरखनाथ शिंदे यांनी आभार मानले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे