महाराष्ट्र

नामदेवराव परजणे पाटील संकुलाचा संत महंतांच्या उपस्थितीत शुभारंभ

नामदेवराव परजणे पाटील संकुलाचा संत महंतांच्या उपस्थितीत शुभारंभ

संपादक :- रविंद्र जगताप

कोपरगांव:-गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाने येथील स्टेशन रस्त्यावर नव्याने उभारलेल्या भव्य अशा व्यापारी संकुलात श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करून अनेक संत महंतांच्या उपस्थितीत थाटामाटात शुभारंभ करण्यात आला.कोपरगांव बेट येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे महंत प. पूज्य रमेशगिरीजी महाराज, संवत्सर येथील महानुभाव आश्रमाचे महंत प. पूज्य राजधरबाबा, विश्वात्मक जंगली महाराज आश्रमाचे महंत प. पूज्य परमानंद महाराज यांच्या हस्ते प्रारंभी दहिहंडी फोडून व्यापारी संकुलामधील शुशोभिकरणाचे विधीवत उद्घाटन करण्यात आले. गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक करुन संत महंतांचा यथोचित सत्कार केला. प्रास्ताविकातून श्री परजणे पाटील यांनी संघाच्या विविध योजनांची माहिती देताना संघाने नव्याने उभारलेल्या नामदेवरावजी परजणे पाटील व्यापारी संकुलाच्या माध्यमातून परिसरातील उद्योग व्यसायाला चांगली चालना मिळाली असून भविष्यात दूध उत्पादकांच्या उन्नतीसाठी आणि दुग्ध व्यवसाय वाढीसाठी विविध योजना राबविण्याचा आपला मानस असल्याचे सांगितले. गोदावरी दूध उत्पादक संघाचे संस्थापक दिवंगत नेते आदरणीय नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांच्या संकल्पनेतील दुग्ध व्यवसायाला महाराष्ट्रभर ओळख मिळालेली असून भविष्यातही हा व्यवसाय अधिक बळकट आणि सक्षम होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे सांगून संकुलाच्या शुभारंभासाठी उपस्थित राहिलेल्या संत महंतांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

जाहिरात
जाहिरात

महंत रमेशगिरीजी महाराज यांनी दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील यांच्या कार्याचे कौतुक करुन दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून परजणे आण्णा यांनी तालुक्यातीलच नव्हे तर आसपासच्या तालुक्यातील शेतकरी वर्गासाठी उपजिविकेचे मोठे साधन निर्माण केलेले आहे. आज हजारो लोकांना गोदावरीच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे. राजेश परजणे यांनी आपल्या कल्पक विचारातून संघाच्या कार्यक्षेत्रात नवनवीन आणि अत्याधुनीक असे प्रकल्प राबविले असून त्याचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला लाभ मिळत आहे. नव्याने उभारलेले व्यापारी संकूल हे कोपरगांव शहराच्या वैभवात भर घालणारे तर आहेच परंतु परजणे आण्णा यांच्या संकल्पनेतील यशस्वी वाटचाल अधोरेखित करणारे असल्याचे सांगून भविष्यात संघाच्या माध्यमातून अशीच प्रगती होत रहावी अशा शुभेच्छाही प. पूज्य रमेशगिरीजी महाराज यांनी दिल्या.यावेळी प. पूज्य राजधरबाबा, प. पूज्य परमानंदजी महाराज यांनीही नवीन व्यापारी संकुलासाठी शुभेच्छा व्यक्त करून आशीर्वादपर संदेश व्यक्त केले. बायफ संस्थेने सुरु केलेल्या किसान मार्ट या दुकानाचेही यावेळी संत महंतांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास बायफचे राज्य विभागीय संचालक व्ही. बी. दयासा, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, कैलासचंद ठोळे, अॅड. वाल्मिकराव काजळे, दत्तूनाना कोल्हे, गणेश आढाव, अजित कोरके, सुरेशराव बोळीज, किरण रासकर, आर्किटेक्ट प्रकाश निकम पाटील, नानासाहेब सिनगर, अरुणराव येवले, संजय होन, डॉ. मुळे, डॉ. प्रकाश पहाडे, राजेंद्र शिरोडे, योगेश जोबनपुत्रा, कोपरगांव बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम, उपसभापती गोवर्धन परजणे, संचालक खंडू फेपाळे, रामदास केकाण, राजेंद्र निकोले, साहेबराव लामखडे, प्रकाश गोर्डे, रिखबचंद काले. विजयराव जगताप, शरदराव शिंदे, जयराम पाचोरे, सयराम कोळसे, उत्तमराव माने, भाऊसाहेब काळे, अजयराव आव्हाड, दत्तात्रय शितोळे, रामभाऊ निकम, परभतराव निकम, शफीक सय्यद, सोपान चांदर, डॉ. कृष्णा मलिक, नरेंद्र ललवाणी, रोहीत टेके, अॅड. गंगाधर कोताडे, अशोकराव काजळे, राजेंद्र काजळे, बाबासाहेब फटांगरे, संदीप गुडघे, दगू गुडघे, अरविंदराव जगताप, बाबुराव मैंद, मारुतराव चांदर, प्रभाकर घाटे, निवृत्ती नवले, संजय खांडेकर, भिकाजी थोरात, गोरखनाथ शिंदे, नानासाहेव शिंदे, सुंदरराव कदम, मच्छिंद्र कदम, यशवंतराव गव्हाणे, सीताराम कांडेकर, भास्करराव डुकळे, नामदेवराव शिंदे, वसंतराव जाधव, अंबादास वडांगळे, विजय वडांगळे, मुनिष ठोळे, मनिष शहा, सचिन अजमेरे, लक्ष्मणराव परजणे, सोमनाथ निरगुडे, लक्ष्मणराव परजणे, गोदावारी दूध संघाचे उपाध्यक्ष गोपीनाथ केदार, विवेक परजणे, उत्तमराव डांगे, सुभाषराव होन, जगदीप रोहमारे, नानासाहेब काळवाघे, भाऊसाहेब कदम, संजय दुपके, गोरक्षनाथ शिंदे, सुदामराव शिंदे, सुदामराव कोळसे, भिकाजी झिंजुर्डे, दिलीप मिरमखे, कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.



वन नेशन व इलेक्शन फायदा तोटा काय आहे सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा

https://youtu.be/zRwW6LaVO2c?si=8_m2XTUFJFhlHLDh

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/KgmXrffhj0F6D04zF6eSoo

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे