ब्रेकिंग

सावळीविहीर फार्म शाळेला दोन स्मार्ट टीव्ही केल्या सुपूर्त ……

सावळीविहीर फार्म शाळेला दोन स्मार्ट टीव्ही केल्या सुपूर्त ……

संपादक:- रवींद्र जगताप

 सावळीविहीर/- राहाता तालुक्यातील सावळीविहीर खुर्द येथील सावळीविहीर फार्म जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकत्याच आयोजित कार्यक्रमात डिजिटल वर्गासाठी सरपंच अशोकराव जमधडे यांच्या हस्ते दोन स्मार्ट टीव्ही शाळेचे मुख्याध्यापक संदिप घोलप यांच्याकडे सुपुर्त केल्या यातील एक स्मार्ट टीव्ही लोकसहभागातून तर दुसरी स्मार्ट टीव्ही ग्रामपंचायत मार्फत आहे यावेळी अशोकराव जमधडे म्हणाले की स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम करुन हे शिक्षक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करत असतात

 
यामुळे पटसंख्या वाढीव होणे हे कौतुकास्पद आहे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी हे नक्कीच भावी काळात गरुडझेप घेणार तसेच राजेंद्र जमधडे पोलिस पाटील म्हणाले की पालकांचा दृष्टिकोन बदलला आहे जिल्हा परिषद शाळेत डिजिटल वर्ग सुरू केल्याने पालकवर्गाची समाधानकारक भुमिका स्पष्ट होत आहे शाळेचे मुख्याध्यापक यांनी उपस्थित मान्यवर मंडळींचा सत्कार केला आहे यावेळी सावळीविहीर खुर्द संरपच अशोकराव जमधडे, पोलिस पाटील राजेंद्र जमधडे, ग्रामसेविका सौ.प्राजक्ता टेमक मॅडम, ग्रा.सदस्य साईनाथ झिजाड,ग्रा सदस्य महेश जमधडे, व्य.स.उपाध्यक्ष विजय खरात, अजित कराडे,गणपत क्षिरसागर, भुषण सोनवणे, मनोहर खरात, संतोष भदे, योगेश देसले, सुनील सुरळे, स्वप्निल चव्हाण, देवकर शोभा नजराना शेख ,अलका सुरळे, मोठ्या संख्येने पालकवर्गाची उपस्थिती होती.शेवटी शाळेचे शिक्षक योगेश बोरसे सर यांनी आभार मानले

जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे