महाराष्ट्र

आ. आशुतोष काळेंच्या हस्ते पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्थामयत कर्जदाराच्या वारसास ३.६०लाखाचा धनादेश

पद्मविभुषणडॉ.शरदचंद्रजी पवार पतसंस्था मयताच्या वारसास३.६० लाखाचा धनादेश देतांना आ. आशुतोष काळे समवेत चेअरमन देवेंद्र रोहमारे व संचालक मंडळ.

आ. आशुतोष काळेंच्या हस्ते पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्थामयत कर्जदाराच्या वारसास ३.६०लाखाचा धनादेश

               संपादक:-रवींद्र जगताप

कोपरगाव:कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर येथीलपद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार साहेब नागरीसहकारी पतसंस्थेचे कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील कर्जदार यशवंत बापू हाळनोर यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांना विमा कंपनीकडून मिळालेला ३.६० लाखाच्या नुकसान भरपाईचा धनादेश नुकताच कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते त्यांच्या वारस पत्नी श्रीमती अलका यशवंत हाळनोर यांना देण्यात आला आहे.कुटुंब प्रमुखाच्या अकस्मात निधनामुळे कुटुंबापुढे निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणीतून ते कुटुंब सावरले जावून त्या कुटुंबाची आर्थिक अडचण दूर व्हावी यासाठी संस्थेचे मार्गदर्शक मा.आ.अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसारपद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार नागरीसहकारी पतसंस्थेने संस्थेच्या सर्व कर्जदारांचाओरीएंटल इंशुरन्स कंपनीकडून विमा उतरविला आहे. संस्थेचे कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील मयत कर्जदार यशवंत बापू हाळनोर यांचा देखील यामध्ये समावेश असल्याने संस्थेने त्यांचा रु.४,५०,०००/- रुपयांचा विमा उतरविलेला होता. कर्जदार यशवंत बापू हाळनोर यांचे अपघाती निधनानंतरसंस्थेकडून ओरीएंटल इंशुरन्स कंपनीकडे विमा पॉलिसीची भरपाई मिळावी यासाठी आवश्यकत्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती.दि ओरीएंटल इंशुरन्स कंपनीने त्या सर्वकागदपत्रांची पडताळणी करून मयत सभासद स्व. यशवंत बापू हाळनोर यांच्या वारसांनापॉलिसिपोटी ३.६० लाख रुपयांची जनता व्यक्तिगत दुर्घटना विमा रक्कम मंजूर केली.त्या रक्कमेचा धनादेश नुकताच मयत यशवंत हाळनोर यांच्या वारस त्यांच्या पत्नी श्रीमती अलका यशवंत हाळनोर यांना आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे, व्हा. चेअरमन रावसाहेब चौधरी, संचालक, अनिल महाले, महेंद्र काळे, सुदाम वाबळे, व्यंकटेश बारहाते, सौ. मेघा कडवे, सौ.परवीन सय्यद, वीरेंद्र शिंदे, ज्ञानेश्वर हाळनोर, दि ओरीएंटलइंशुरन्स कंपनीचे विमा प्रतिनिधी कैलास पांडे, मॅनेजर मंगेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते..

जाहिरात
जाहिरातत



वन नेशन व इलेक्शन फायदे तोटे जाणून घ्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा

या कारणांमुळे मी राजकारणात प्रवेश केला सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा
सत्य एक्सप्रेस न्यजच्या व्हाँटसाप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

 

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे