विशेष वसुली व विक्री अधिकारी यांना सात हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी अटक
विशेष वसुली व विक्री अधिकारी यांना सात हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी अटक
संपादक रवींद्र जगताप
प्रस्तुत बातमीतील हकीगत अशी की, तक्रारदार यांनी २०१६ मध्ये भैरवनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, मर्या. केडगांव, अहमदनगर येथून ५,००,०००/- रुपये कर्ज घेतले होते. सदर कर्ज घेते वेळी तक्रारदार यांनी त्यांच्या आई व मामाच्या नावे असलेली त्यांची भोरवाडी, ता.नगर शिवारातील शेत गट नं.४९९ मधील १ हेक्टर ३० आर क्षेत्र जमीन तारण म्हणून दिली होती. तक्रारदार यांना पतसंस्थेकडून सदर कर्जफेड करण्यासाठी ५ वर्षाची मुदत देण्यात आलेली होती परंतु तक्रारदार मुदतीत कर्ज फेड करु शकले नाही त्यामुळे सदर वसुली बाबत भैरवनाथ पतसंस्थेने सहायक निबंधक सहकारी संस्था, अहमदनगर तालुका पतसंस्था फेडरेशन कडे पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार सदर वसुली करण्यासाठी सहायक निबंधक सहकारी संस्था, अहमदनगर तालुका पतसंस्था फेडरेशन ने दि. २५/ ५ / २०२३ रोजी सुनावणी ठेवली होती. सदर सुनावणीस तक्रारदार यांना हजर राहणेबाबतची नोटीस प्राप्त होती. त्यानुसार तक्रारदार पण त्या ठिकाणी हजर होते, त्यादिवशी तक्रारदार यांनी फेडरेशनचे वसुली अधिकारी आरोपी लोकसेवक यासिन नासर अरब, वय ४२ वर्ष, विशेष वसुली व विक्री अधिकारी, अहमदनगर तालुका पतसंस्था फेडरेशन, अहमदनगर यांना कर्ज फेड करण्यासाठी २ महिन्याची मुदत मागितली असता आरोपी लोकसेवक अरब यांनी तक्रारदार यांना तोंडी दोन महिन्याची मुदत वाढ दिली होती. त्यानंतर कर्ज फेड मुदतवाढीसाठी फी म्हणून दि. २३/८/२०२३ रोजी १००० /- रुपये फी मागितली असता तक्रारदार यांनी त्यांच्या फोन पे ला १०००/- रुपये फोन पे केले त्याबाबत तक्रारदार यांना कोणतीही शासकीय पावती दिली नाही. त्यानंतर तक्रारदार यांनी दि. ३१/८/२०२३ रोजी भैरवनाथ पतसंस्थेचे सर्व कर्ज फेड केले तसा पतसंस्थेने कर्ज निल दाखला तक्रारदार यांना दिला होता. त्यानंतर दि.४ /९/२०२३ ते दि.७/९/२०२३ दरम्यान आरोपी लोकसेवक अरब यांनी तक्रारदार यांना वारंवार मोबाईल कॉल करून मी तुला कर्ज फेड करण्यास मुदत दिली, तुझ्या जमिनीवर जप्ती येऊ दिली नाही, लिलाव होऊ दिला नाही, तुला मदत केल्याच्या मोबदल्यात तू मला ३०,०००/- रुपये दे अशी लाच मागणी होत असलेबाबतची तक्रार दि.७/९/२०२३ रोजी तू ला.प्र.वि. कार्यालय, अहमदनगर येथे तक्रारदार यांनी दिली होती. सदर तक्रारीच्या अनुषंगाने पंचासमक्ष दि.७/९/२०२३ व दि. ८/९/२०२३ रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली असता आरोपी लोकसेवक अरब यांनी तक्रारदार यांचेकडे ३०,००० /- रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती २०,०००/- रुपये लाच मागणी करुन पहिला हप्ता म्हणून ७०००/- रुपये लाच रक्कम प्रथम स्वीकारण्याचे व पुढील दोन दिवसानंतर १३,०००/- रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार दि. ८/९/२०२३ रोजी सापळा आयोजित करण्यात आला असता आरोपी लोकसेवक अरब यांनी तक्रारदार यांचेकडून नगद स्वरुपात लाच स्वीकारली नाही. त्यांनी सदर लाच रक्कम फोन पे वर सेंड करण्यास सांगितले होते.
या कारणांमुळे मी राजकारणात प्रवेश केला पंकजाताई मुंडे सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा
दि.१५/९/२०२३ रोजी आरोपी लोकसेवक अरब हे कार्यालयात हजर असतांना सदरची सापळा कारवाई आयोजित करुन तक्रारदार यांचे फोन पे वरून ७०००/- रुपये लाच रक्कम आरोपी लोकसेवक अरब यांचे फोन पे वर सेंड करण्यात आली व आरोपी लोकसेवक अरब यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सदर बाबत कोतवाली पो.स्टे., जि. अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.सदर कारवाई ही मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, मा. श्री. माधव रेडडी, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक व श्री नरेंद्र पवार, वाचक पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच श्री. प्रविण लोखंडे, पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर यांचे पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक श्री. शरद गोर्डे, पोलीस निरीक्षक श्री. राजु आल्हाट, पोना रमेश चौधरी, पोकॉ. रविंद्र निमसे, पोकॉ. सचिन सुदुक, पोकॉ. वैभव पांढरे, पोकॉ. बाबासाहेब कराड, चालक पोहेकॉ हारुण शेख व चालक पोहेकॉ दशरथ लाड यांचे पथकाने केली आहे.कोणीही लोकसेवक सर्व सामान्य जनतेला त्यांचे काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय, अहमदनगर येथे खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उप अधीक्षक प्रविण लोखंडे यांनी केले आहे.


वन नेशन व इलेक्शन फायदे तोटे जाणून घ्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा