कृषीवार्ता

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने टाकळी येथे सोयाबीन बियाणे, खते वाटप:- मा.सभापती सुनिल देवकर

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने टाकळी येथे सोयाबीन बियाणे, खते वाटप:- मा.सभापती सुनिल देवकर

संपादक:- रवींद्र जगताप

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने मौजे टाकळी येथे राज्य पुरस्कृत सोयाबीन प्रकल्प 100 हेक्टर राबविण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत 55 क्विंटल फुले संगम जातीचे प्रमाणित बियाणे वितरित केले गेले असून प्रकल्पांतर्गत विविध प्रकारच्या निविष्ठा औषधी खते देखील वाटप केली जात आहेत यात नॅनो युरिया व डीएपी १८:४६:०० या खतांची द वाटप करण्यात आलेली असून नॅनो युरिया 100 लीटर व डीएपी ५० लिटर चे वाटप करण्यात आलेले होते तसेच आज दिनांक 14/9/2023 रोजी इमामेक्टीन बेंझोएट 25की., मायक्रोnutrient (ग्रेड- २) २०० ली. व कामगंध सापळे व लूरस 1500 नग यांचे मोफत वाटप करण्यात आले असून कृषी विभागाच्या योजनेविषयी टाकळी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले वाटप करतांनी मा. सभापती सुनिल देवकर व सरपंच संदीप देवकर यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी माननीय तालुका कृषी अधिकारी श्री मनोज सोनवणे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. या वेळी कृषी पर्यवेक्षक श्री तुंबारे कृषी सहाय्यक श्री विजय कोर. पोलिस पाटील राजेंद्र देवकर छगनराव देवकर.गणेश देवकर . सदस्य शशिकांत देवकर.गणेश पळसकर.संजय पाईक.महेश डमाळे.अजय देवकर. सुभाष देवकर.चंद्रभान देवकर.रंगनाथ शेलार.आणि उपसरपंच संजय देवकर ग्रामस्थ उपस्थित होते.

जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे