ब्रेकिंग

संस्काराचे निगडित रांगोळी हे पवित्र पणाचे प्रतिक.- अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर

संस्काराचे निगडित रांगोळी हे पवित्र पणाचे प्रतिक.- अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर

सूर्यतेज दीपावली- पाडवा घर तेथे रांगोळी स्पर्धा २०२२ पारितोषिक वितरण…

संपादक:- रवींद्र जगताप

संस्काराचे निगडित रांगोळी हे समाजाचे अन् पवित्र पणाचे प्रतिक असून रांगोळीने मन आणि परिसर पवित्र होवून जाते.सूर्यतेजने घर तेथे रांगोळी स्पर्धेसह विविध उपक्रम कौतुकास्पद असल्याचे उद्गार शिर्डीचे पहिले अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केले.सूर्यतेज संस्था कोपरगांव वतीने कोपरगांव फेस्टिव्हल अंतर्गत दीपावली-पाडवा निमित्ताने घर तेथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र राज्यात नावाजलेल्या या स्पर्धेचा उपक्रम १० वर्षापासून सुरू आहे.कृष्णाई बँक्वेट हाॅल येथे सन २०२२ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे शिर्डीचे पहिले अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, वनपाल सुनिता यादव, सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके, सूर्यतेज सल्लागार अॅड. स्मिता जोशी, डॉ. निलीमा आव्हाड, मसुदा दारूवाला,पुनम अमृतकर,वास्तुरचनाकार प्राजक्ता राजेभोसले आदि मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांना स्नेहवस्र, सन्मानचिन्ह, झाडाचे रोप देवून सन्मान करण्यात आला

जाहिरात
जाहिरात

 

या स्पर्धेला विसपुते सराफ, राष्ट्रीय आयुर्वेद गुरू डॉ. रामदास आव्हाड, अग्रवाल चहा कंपनी, पुष्पांजली शाॅपी, कापसे पैठणी, सुशांत आर्ट्स अॅन्ड पब्लिसिटी, पांडे स्विटस् यांचे विशेष सहकार्य लाभले.पारंपरिक, निसर्ग चित्र, व्यक्ती चित्र, सामाजिक विषय, व्यंगचित्र या पाच कलाप्रकारात आयोजित केलेल्या स्पर्धेत ३२५ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यातील प्रथम क्रमांकास कापसे पैठणी,सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र तर गुणवत्ता रांगोळीस पुष्पांजली भेट वस्तू, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देवून सन्मान करण्यात आला.या प्रसंगी मानाची रांगोळी साकारणा-या मसुदा दारूवाला आणि अहमदाबाद येथे संपन्न झालेल्या इंडिया स्टिम क्विझ (सायन्स टेक्नॉलॉजी) स्पर्धेत भारतातील ५ लक्ष विद्यार्थींमधून प्रथम क्रमांक मिळालेल्या चार्वि कोठारी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचा शुभारंभ भारतमाता प्रतिमा पुजनाने मान्यवरांच्या हस्ते झाला.शारदा संगित विद्यालयाच्या विद्यार्थींनी स्वागतगीत सादर केले.बक्षिस विजेत्यांमध्ये प्राप्ती बुधवंत यांनी सूर्यतेजच्या आयोजनाचे कौतुक करुन आभार मानले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व नोंदणी अधिकारी तसेच परिक्षण समिती प्रमुख कल्पना गिते,ऐश्वर्या बिडवे,शिवानी गवळी,अनिल अमृतकर, अनंत गोडसे, महेश थोरात, स्नेहल पगारे, वासंती गोंजारे,भाग्यश्री जोशी, अमोल शिंपी आदि सह सूर्यतेज संस्थेचे सदस्य आणि दीपावली- पाडवा घर तेथे रांगोळी स्पर्धा आयोजन समितीने विशेष परिश्रम घेतले.सुत्रसंचलन राधिका तोरणे यांनी केले तर सामुदायिक वंदेमातरम् गायनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे