ब्रेकिंग

नीरज चोप्राची सुवर्णभेदी कामगिरी.

नीरज चोप्राची सुवर्णभेदी कामगिरी.

संपादक :- रवींद्र जगताप
कोपरगाव :-चीन येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्रा याने भालाफेकीत सर्वोच्च कामगिरी करत आपल्या देशासाठी सुवर्ण पदक पटकावले ही कामगिरी सुवर्णभेदी असून संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेकभैया कोल्हे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. भारत देशाने 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 80 पेक्षा जास्त पदके पटकावून क्रीडा क्षेत्रात इतर देशांच्या तुलनेने चांगली कामगिरी केली आहे. आपल्या देशात ग्रामीण भागासह शहरी भागातील खेळाडूंमध्ये क्षमता आहे त्याला मोटिवेट आणि योग्य मार्गदर्शन दिले तर निश्चितच ऑलम्पिक स्पर्धेत आपला देश सर्वांच्या पुढे राहील. बुधवारी रात्री चीन येथे झालेल्या भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्रा बरोबरच किशोर कुमार जेना या दुसऱ्या भारतीयांने देखील बेस्ट थ्रो करत पदक आपल्या नावावर केले आहे, या दोघांचाही आपल्याला अभिमान आहे असे विवेक भैय्या कोल्हे शेवटी म्हणाले.
जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे