सामाजिक

लावणी सम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर यांना आ. आशुतोष काळे यांच्याकडून १० हजारांची मदत

लावणी सम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर यांना आ. आशुतोष काळे यांच्याकडून १० हजारांची मदत

सपादक:-रविंद्र जगताप

कोपरगाव  :- एकेकाळची लावणी सम्राज्ञी शांताबाई लोंढे उर्फ शांताबाई कोपरगावकर यांना वृद्धापकाळामुळे आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी अत्यंत वाईट परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचे प्रसिद्धी माध्यमातून समोर आले आहे. त्याची दखल घेवून शांताबाई कोपरगावकर यांना मदत म्हणून १० हजार रुपयांची मदत देणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

लावणी सम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर यांची व्यथा राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलचे प्रदेश चिटणीस डॉ.अशोक गवित्रे यांनी आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांच्या मार्फत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्याकडे मांडली होती.त्याची अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांनी तात्काळ दखल घेवून लावणी सम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर यांचे पालकत्व स्विकारण्याची तयारी दर्शविली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने १ लाख रुपयांची मदत उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

 महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञीचे वृद्धापकाळामुळे होत असलेली जीवघेणी ओढताण जागरूक पत्रकारांनी समाजासमोर आणल्यामुळे एकेकाळी तमाशा रसिकांना आपल्या अदाकारीने घायाळ करणारी लावणी सम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर वृद्धापकाळामुळे बस स्थानकात अतिशय बिकट परिस्थितीत जीवन जगत असल्याचे दिसून आले आहे. जवळचे नातेवाईक कुणी नसल्यामुळे त्यांच्यावर अशी वाईट परिस्थिती उद्भवली आहे.कर्मवीर शंकररावजी काळे साहेब व माजी आमदार अशोकराव काळे  यांना कला क्षेत्राविषयी आपुलकी असल्यामुळे त्यांनी नेहमीच कलावंतांचा आदर करून त्यांना वेळोवेळी अपेक्षित मदत केलेली आहे. ही सामाजिक बांधिलकी जोपासतांना शांताबाई कोपरगावकर यांना जीवन जगतांना आर्थिक मदत देवून त्यांचे पुढील जीवन सुसह्य व्हावे यासाठी १० हजार रुपयांची मदत देणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्यासाठी आमच्या व्हाटसाँप ग्रुपवर
 सहभागी व्हा,सहभागी होण्यासाठी खालिंल
 लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/CTDmmJtLO0G0xxPjGv1gcS
जाहिरात

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे