क्रिडा व मनोरंजन

राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी गौतमच्या हॉकी संघाचे दिल्लीकडे कूच

राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी गौतमच्या हॉकी संघाचे दिल्लीकडे कूच

संपादक :- रवींद्र जगताप

कोपरगाव प्रतिनिधी :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलच्या सब-ज्युनिअर हॉकी संघाने जिल्हास्तरीय,विभागीय व राज्यस्तरीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धांमध्ये केलेल्या नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर दि.१२ ते २२ ऑक्टोबर दरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करण्यासाठी दिल्लीकडे कूच केल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.

जाहिरात
जाहिरात

गौतम पब्लिक स्कूलने क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. गौतमच्या विजयी सब-ज्युनिअर हॉकी संघाने दिनांक २५ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर दरम्यान पुणे बालेवाडी येथील शिव छत्रपती स्टेडियम येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय नेहरू हॉकी स्पर्धेत महाराष्ट्रातील कोल्हापूर, औरंगाबाद अशा बलाढ्य संघांना पराभूत करण्याची किमया केली आहे. गौतम पब्लिक स्कूलचा क्रीडा क्षेत्रातील दबदबा कायम असून आजतागायत गौतमचा हॉकी संघ दहाव्यांदा राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करीत आहे.दिल्ली येथील शिवाजी आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे पार पडणाऱ्या राष्ट्रीय जवाहरलाल नेहरू हॉकी स्पर्धेत गौतमचा विजयी संघ महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करणार आहे. महाराष्ट्र नेहरू हॉकी तथा गौतम पब्लिक स्कुलच्या सब-ज्युनियर हॉकी संघात मंथन देवरे (कर्णधार), शोएब शेख (उप-कर्णधार), महेश गायके (गोलकीपर), सुरज पाटील, श्रेयस तासकर, रोनक पाटील, संकेत गायकवाड,सोहम खिरीद, विपुल साळुंके, आयुष मोगल, ओम क्षीरसागर, श्लोक महागावकर, द्रोण अहिरे, समर्थ पवार व ओम मुरडणर आदी खेळाडूंचा समावेश आहे. गौतमच्या हॉकी खेळाडूंच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पालक वर्गातून कौतुकाचा वर्षाव होत असून राष्ट्रीय स्पर्धेस दिल्ली येथे रवाना होण्यापूर्वी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अशोकराव काळे, संस्थचे विश्वस्त आ. आशुतोष काळे, संस्थेच्या सचिव सौ. चैतालीताई काळे. सर्व संस्था सदस्य, प्राचार्य नूर शेख, पालक आदींनी सर्व खेळाडूंना विजयी अभियान अबाधित ठेवण्यासाठी शुभेच्छा दिल्या. गौतमच्या हॉकी संघाच्या खेळाडूंकडून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन होवून गौतम पब्लिक स्कूलचा मैदानावरचा दबदबा कायम राहावा यासाठी प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, क्रीडा संचालक सुधाकर निलक,सर्व क्रीडा प्रशिक्षक, सर्व हाउस मास्टर्स यांनी मेहेनत घेतली आहे.




६२ जणांचा मृत्यु याला जबाबदार कोण सविस्तर बातमीसाठी खालील लिंक दाबा

https://youtu.be/bRBJRslFbmk?si=QaY0242jIxfBwNUd

दिन विशेष इदिरा एकादशी विशेष

यदा मंगळवारी 10 ऑक्टोबर रोजी इंदिरा एकादशीचे व्रत आहे. एकदा धर्मराजा युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णाला भाद्रपद एकादशी व्रताचे महत्त्व सांगण्यास सांगितले. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला सांगितले की हे व्रत इंदिरा एकादशी व्रत म्हणून ओळखले जाते. हे व्रत केल्याने पुण्य प्राप्त होते, पाप नाहीसे होते आणि पूर्वजांना मोक्ष मिळतो. पाहुया काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांनी इंदिरा एकादशी व्रताची सांगितलेली कथा.

इंदिरा एकादशी व्रताची कथा

सत्ययुगात इंद्रसेन नावाचा राजा महिष्मती नगरावर राज्य करत होता. तो भगवान विष्णूचा भक्त होता, त्याला कशाचीही कमतरता नव्हती. एके दिवशी नारद मुनी त्यांच्या दरबारात आले. राजाने त्यांचा सन्मान केला आणि येण्याचे प्रयोजन विचारले.तेव्हा नारदजी म्हणाले की, मी एके दिवशी यमलोकात गेलो होतो. तेथे यमराजांना भेटलो, त्यांचे कौतुक केले. त्यादरम्यान मी तुझ्या वडिलांना पाहिले. ते यमलोकात होते. नारदजींनी आपल्या वडिलांचा संदेश राजा इंद्रसेनला सांगितला. त्यांच्या वडिलांनी सांगितले की, काही कारणास्तव त्यांच्या एकादशी व्रतामध्ये काही अडथळे येत होते, त्यामुळे त्यांना यमलोकात यमराजांसोबत वेळ घालवावा लागतोय. तुमच्याकडून शक्य असेल तर वडिलांसाठी इंदिरा एकादशीचे व्रत करा. याने ते यमलोकातून मुक्त होऊन स्वर्गात स्थान मिळवू शकतील.तेव्हा राजा इद्रसेनने नारदांना इंदिरा एकादशी व्रताची पद्धत सांगण्यास सांगितले. नारदजी म्हणाले की, इंदिरा एकादशी व्रताच्या दिवशी स्नान वगैरे करून भगवान शालिग्रामसमोर पितरांचे श्राद्ध करा. ब्राह्मणांना फळे आणि अन्न अर्पण करा नंतर त्यांना दक्षिणा द्या. त्यानंतर उरलेले अन्न गायीला खाऊ घाला.त्यानंतर धूप, दिवा, सुगंध, फुले, नैवेद्य इत्यादींनी भगवान ऋषिकेशाची पूजा करावी. नंतर रात्री भागवत जागरण करावे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान वगैरे करून पूजा करून ब्राह्मणांना भोजन द्यावे. यानंतर स्वतः भोजन करून व्रत पूर्ण करा. नारदजी म्हणाले की हे राजन! जर तुम्ही इंदिरा एकादशीचे व्रत पद्धतशीरपणे केले तर तुमच्या वडिलांना नक्कीच स्वर्गात स्थान मिळेल. यानंतर नारदजी तेथून निघून गेले.भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी आल्यावर राजा इंद्रसेनने इंदिरा एकादशीचे व्रत पद्धतशीरपणे केले. या व्रताच्या पुण्य परिणामामुळे त्यांचे वडील यमलोकातून मुक्त होऊन विष्णुलोकात गेले. मृत्यूनंतर राजा इंद्रसेनलाही स्वर्ग मिळाला.

सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सत्य एक्सप्रेस त्याची हमी देत नाही

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे