आ. आशुतोष काळेंच्या लोकहिताच्या दृष्टीकोनातून प्रशासन आणि नागरीकांमधील दरी कमी महाराजस्व समाधान शिबिरातून सेवा तुमच्या दारी संकल्पना प्रत्यक्षात उतरली

आ. आशुतोष काळेंच्या लोकहिताच्या दृष्टीकोनातून प्रशासन आणि नागरीकांमधील दरी कमी महाराजस्व समाधान शिबिरातून सेवा तुमच्या दारी संकल्पना प्रत्यक्षात उतरली
कोपरगाव वार्ताहर- कोपरगाव मतदार संघातील नागरीकांना आवश्यक असलेले सर्व प्रकारचे शासकीय दाखले एकाच छ्ताखाली आणि एकाच वेळी कमी वेळेत आणि कमीत कमी त्रासात उपलब्ध व्हावेत यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीराचे मत्दर संघातील प्रत्येक महसूल मंडळात प्रभावीपणे आयोजन केल्यामुळे ‘महसूलची सेवा तुमच्या दारी’हि संकल्पना प्रत्यक्षात उतरली असल्याचे समाधानकारक चित्र सोमवार (दि.११) रोजी कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील दहेगाव बोलका याठिकाणी पहावयास मिळाले.

महायुती शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत नागरिकांचे शासकीय विभागांशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी आ. आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून दहेगाव बोलका मंडळात महाराजस्व अभियान समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि महिला यांना प्रशासकीय कामांसाठी कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याचा त्रास वाचला असून आ.आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून महादेव मंदिर दहेगाव बोलका येथे आयोजित महाराजस्व शिबिरात अनेक नागरीकांना हवे असलेले विविध दाखले एकाच दिवसात आणी अतिशय कमी वेळात मिळाली आहे. यावेळी उपस्थितांच्या हस्ते नागरिकांना विविध दाखल्यांचे, प्रमाणपत्र, उतारे आणि इ रेशन कार्ड चे वितरण करण्यात आले.

सर्वसामान्य नागरीकांन शासकीय कामांसाठी अनेक वेळा कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र ‘महाराजस्व’ अभियानामुळे नागरिकांची ही गैरसोय मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे. प्रशासनाच्या समन्वयातून नागरिकांना आवश्यक कागदपत्रे जलद गतीने मिळत असल्याने वेळ आणि श्रम दोन्हींची बचत होत आहे. या अभियानांतर्गत उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेअर आदी महत्त्वाचे दाखले सहज उपलब्ध करून दिले जात आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना या उपक्रमाचा मोठा फायदा होत असून, शासकीय सेवा अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख होत असल्याची भावना नागरीकांकडून व्यक्त केली जात आहे.यावेळी नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे, मंडलाधिकारी अनिल मांढरे, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, दहेगाव बोलकाचे सरपंच भरत चौधरी, उपसरपंच रितेश वल्टे, भोजडेचे सरपंच सुधाकर वादे, लौकीचे सरपंच आजीनाथ खटकाळे, शिवाजीराव ठाकरे, दिगंबर जाधव, राजेंद्र खिलारी, बबनराव भवर, भाऊराव देवकर, विजय टूपके, चंद्रकांत जाधव, भागीनाथ शेळके, जगनराव बागल, जनार्दन भवर, सुनिल वालतुरे, बद्रीनाथ वल्टे, सिद्धेश्वर वारकर, नानासाहेब डोंगरे, गोपाल कुलकर्णी, शासकीय अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk
कोपरगावात वास्तव राहिलेल्या शुरविरांची एतिहासिक माहिती सांगणारे सुमित डेंगळे यांचे व्याख्यान
https://youtu.be/Df5URqrYhUg?si=Ekk0eEF7k6jq00Hr
सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा
https://www.youtube.com/@satyaexpressnews
धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा
https://youtube.com/playlist?list=PL3j0O8rqVMWP4evas-rsmf1AV4ZkbIr8j&si=ZWWHIRV6FcdqDo2I
संपादक रविंद्र जगताप सत्य एक्सप्रेस
संपादकीय लेख क्र १२ :-कोपरगावचे पत्रकार शंकर दुपारगुडे यांच्या रुपाने जिल्ह्याचे नाव जगभर झळकले,सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2026/02/blog-post_28.html
संपादकीय लेख क्र ११ भारतातील वाढते औद्योगीकरण आणि वाढती लोकसंख्या नागरिकांच्या आरोग्यासमोरील गंभीर आव्हान सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2026/02/blog-post.html
संपादकीय लेख क्र. १० कोपरगावात थंडीचा वाढता जोर, तर निवडणुकीत उमेदवारांची धावपळ आणि कसरत ! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
संपादकीय लेख क्र ९ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर परंतु इच्छुक उमेदवारामध्ये कभी खुशी कभी गम सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
संपादकीय लेख क्र ८ मान्सून पूर्व पावसाने गृह उद्योगाचे मोठे आर्थिक नुकसान सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/05/blog-post_28.html
संपादकीय लेख क्र ७ कोपरगावचा बिहार बिड होवु नये यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/04/blog-post_88.html
संपादकीय लेख क्र. ६ चैत्र व वैशाख महिण्याचे कोपरगावचे अध्यात्मिक महत्व संपुष्टात? सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/04/blog-post_28.html
संपादकीय लेख क्र. ५ अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवटची आणि महत्वाची कोपरगाव शहरा नजीक असलेल्या या चौफुलीची दुर्दशा कधी मिटणार सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2025/01/blog-post_8.html
संपादकीय लेख क्र. ४ सावळीविहिर ते कोपरगाव रोड जलद गतीने होणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/06/blog-post.html
संपादकीय लेख क्र.३ श्रीमंतांच्या बेवड्या मुलांवर आवर घालणे गरजेचे सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
संपादकीय लेख क्र.2. जागतिक ग्राहक दिन, जागरूक ग्राहक होणे काळाची गरज, सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/03/blog-post_15.html
संपादकीय लेख क्र.१ कोपरगाव ची महाशिवरात्र आनंदाची एक पर्वणी आणि कोपरगावच्या महाशिवरात्रीचे बदलते स्वरुप सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंक दाबा
https://satyaexpress24x7.blogspot.com/2024/03/blog-post_9.html




