आरोग्य व शिक्षण

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात जागतिक तलवारबाजी दिन उत्साहाने संपन्न

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात जागतिक तलवारबाजी दिन उत्साहाने संपन्न

भारताच्या भवानी देवी या महीला खेळाडूने २०२० टोकियो आॕलिम्पिक मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले

कोपरगांव शहरांतील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत १०सप्टेंबर हा दीवस जागतिक तलवारबाजी दिन म्हणून उत्साहाने संपन्न झाला.
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात तलवारबाजी खेळाचे साहीत्य पुजन मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांच्या हस्ते झाले. उपमुख्याध्यापक आर.बी.गायकवाड पर्यवेक्षक यु.एस.रायते मॕडम या प्रसंगी उपस्थित होते.तलवारबाजी हा खेळ सन १८९६च्या आधुनिक आॕलिपिंक पासुन ते टोकीयो २०२० आॕलिपिक पर्यत खेळला गेला.अहमदनगर जिल्हात शालेय स्तरांवर या खेळाची सुरुवात श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत सन १९९९पासुन झाली.आजपावेतो जिल्हा पातळी ते आंतरराष्ट्रीय पातळी पर्यत अनेक विदयार्थी या विदयालयांतुन घडले.अशी माहीती विदयालयांचे क्रीडाशिक्षक श्री.निलेश बडजाते यांनी दिली.शिवधत्रपती पुरस्कार विजेते श्री.दिलीप घोडके व त्यांचे सहकारी यांनी या साठी विशेष परीश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदयालयांचे एस.डी.गोरेसर यांनी केले.विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दीलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,आदीनी जागतिक तलवारबाजी दिना निमित्तानं क्रीडाशिक्षक व खेळाडूंना शुभेच्छा दील्या.
डी.पी.कुडकेसर यांनी आभार मानले.या कार्यक्रमाला श्री.एन.के.बडजाते,आर.आर.लकारे,ए.बी.अमृतकर,जी.एस.पडवळ,आदी शिक्षक व विदयार्थी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे