संजीवनीच्या संचालिका डाॅ. मनालीताई कोल्हे यांच्या समवेत राष्ट्रीय खेळाडू अभिषेक निकम. यावेळी सुधा सुब्रमण्यम व श्री सुर्यवंशी उपस्थित होते.
सीबीएसई राष्ट्रीय अथेलेटिक्स स्पर्धेत अभिषेक निकमचा सहभाग
संजीवनी अकॅडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा
संजीवनी अकॅडमीच्या शिरपेचात मानाचा तुरा
कोपरगाव: संजीवनी अकॅडमी, कोपरगाव येथील विद्यार्थी अभिषेक शिवाजी निकम याने सीबीएसई राष्ट्रीय स्तरावरील अथेलेटिक्स स्पर्धा २०२६ मध्ये भालाफेक या क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. पंजाबमधील पतियाळा येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी होण्याचा मान मिळाल्याने अभिषेकच्या क्रीडाप्रवासातील ही एक महत्त्वपूर्ण उपलब्धी ठरली आहे.

अभिषेकने राहाता, जिल्हा अहिल्यानगर येथे आयोजित सीबीएसई क्लस्टर स्तरावरील अथेलेटिक्स स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली होती. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील सीबीएसई संलग्न शाळांमधील खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर त्याची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली. त्याच्या मेहनतीला, जिद्दीला, शिस्तीला आणि खेळातील सातत्यपूर्ण सरावाला मिळालेली ही महत्त्वपूर्ण पावती आहे.

सीबीएसई राष्ट्रीय अथेलेटिक्स स्पर्धेत देशाच्या विविध राज्यांतील गुणवंत खेळाडूंनी सहभाग घेतला होता. अशा व्यापक स्तरावरील स्पर्धेत सहभागी होत अभिषेकला आपले क्रीडा कौशल्य सादर करण्याची, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा अनुभव घेण्याची आणि विविध ठिकाणांहून आलेल्या प्रतिभावान खेळाडूंशी स्पर्धा करण्याची मौल्यवान संधी मिळाली.
खेळातून घडते सक्षम व्यक्तिमत्त्व!
खेळ हा केवळ विजय-पराजयापुरता मर्यादित नसून शिस्त, संघभावना, आत्मविश्वास, संयम, नेतृत्वगुण आणि प्रतिकूल परिस्थितीतही प्रयत्न सुरू ठेवण्याची वृत्ती विकसित करणारे प्रभावी माध्यम आहे. विशेषतः अथेलेटिक्ससारख्या खेळांमध्ये शारीरिक क्षमता, तंत्रशुद्ध सराव, एकाग्रता आणि मानसिक कणखरता यांना अनन्यसाधारण महत्त्व असते. विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबत क्रीडाक्षेत्रातील संधी उपलब्ध करून देण्यावर संजीवनी अकॅडमी भर देत आहे. अभिषेकचा राष्ट्रीय स्तरावरील सहभाग हा इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणारा आहे. या उल्लेखनीय क्रीडाप्रवासाबद्दल संजीवनीचे अध्यक्ष श्री. नितीनदादा कोल्हे आणि मॅनेजिंग ट्रस्टी श्री. अमित कोल्हे यांनी अभिषेकचे अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अकॅडमीच्या संचालिका डॉ. मनालीताई कोल्हे यांनी एका छोटेखानी कार्यक्रमात अभिषेकचा सत्कार करून त्याच्या क्रीडाक्षेत्रातील प्रयत्नांचे कौतुक केले. यावेळी प्राचार्या सुधा सुब्रमण्यम आणि क्रीडा प्रशिक्षक श्री. राहुल सूर्यवंशी उपस्थित होते.अभिषेकच्या या यशस्वी वाटचालीमुळे संजीवनी अकॅडमीच्या क्रीडा क्षेत्रातील प्रयत्नांना नवी प्रेरणा मिळाली असून, भविष्यातही तो आपल्या कौशल्याच्या जोरावर अधिक उंची गाठेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

संपादक रवींद्र जगताप
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालिल लिंक दाबा
https://chat.whatsapp.com/JcX8YoNk9gs6W6YGtE20ZI?s=cl&p=a&ilr=0&amv=2
बातम्यासाठी 9175751349 हा नंबर आपल्या व्हाटसाँप ग्रुपला अँड करा
संपादक रवींद्र जगताप