आरोग्य व शिक्षण

पुणतांबा शिवसैनिकांचे आरोग्यविषयक कार्य समाजासाठी दिशादर्शक

पुणतांबा शिवसैनिकांचे आरोग्यविषयक कार्य समाजासाठी दिशादर्शक

संपादक :- रविंद्र जगताप

पुणतांबा येथे गेल्या बारा महिन्यापासून सुरू असलेल्या हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटामार्फत मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबिर शिवसेना नेते अनिलराव नळे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना विभाग प्रमुख आबासाहेब नळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने सुरू आहे.आजच्या तेविसाव्या टप्प्या अंतर्गत शिवसेनेचे भास्कर मोटकर म्हणाले शिवसैनिक व चांगदेव नगर युवा मंचचे कार्य ज्येष्ठ नागरिकांकरिता वरदान ठरत आहे. यावेळी आयोजक आबासाहेब नळे यांनी सांगितले की अविरतपणे सेवा करून आजपर्यंत २५६ नेत्र रुग्णांवर यशस्वीपणे मोतीबिंदू काचबिंदू व तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया पुणतांबा पंचक्रोशीतील माता भगिनींच्या विना मोबदला करण्यात आल्या .

शिवसेनेचे विभाग प्रमुख आयोजक आबासाहेब रवी पाटील यांनी सांगितले १६०० रुग्णांना योग्य मार्गदर्शन करून मोफत औषधोपचार करण्यात आले. शिवसेनेचे चांगदेव नगर युवा मंचचे कार्यकर्ते मनापासून मेहनत करतात .यावेळी शिवसेनेचे अशोकराव गायकवाड, तोफिक भाई तांबोळी, चांगदेव नगर युवा मंचचे पंकज नळे, दादाभाऊ आगरे, संजय धनवटे, शौकत भाई शहा, दत्ता धनवटे, शिवा भाऊ प्रधान, विकास जोगदंड, विकास गायकवाड, किशोर जमधडे,दत्ता शेठ परदेशी हे शिबिर यशस्वी होण्याकरिता परिश्रम घेत आहेत.शेवटी आभार तोफिक तांबोळी यांनी मांडले.




कोपरगाव तालुक्यातील नंबर १चे व सर्वात जास्त वाचक असलेले सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/JywJRdA1v4oJ19TOQro9T2

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे