महाराष्ट्र

वाड्या वस्तीवरच्या रस्त्याबरोबरच चाऱ्यांच्या रस्त्यांना देखील ना. आशुतोष काळेंनी दिला ३० लाख निधी

वाड्या वस्तीवरच्या रस्त्याबरोबरच चाऱ्यांच्या रस्त्यांना देखील ना. आशुतोष काळेंनी दिला ३० लाख निधी

संपादक -रवींद्र जगताप

कोपरगाव प्रतिनिधी  :- रस्त्यांशिवाय विकास शक्य नाही. मतदार संघाचा विकास साधण्यासाठी रस्ते विकास करणे अत्यंत गरजेचे होते. त्यामूळे श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी जवळपास १०० कोटीच्या आसपास निधी महाविकास आघाडी सरकारकडून दोन वर्षात रस्त्यांसाठी आणला आहे. या निधीतून मुख्य रस्त्यांसह वाड्या वस्त्यांवरील रस्ते देखील विकसित होत असून त्यामुळे नागरिकांचे मागील काही वर्षापासून रस्त्यांमुळे होणारे हाल कायमस्वरूपी थांबणार आहेत. या रस्त्यांबरोबरच ना. आशुतोष काळे यांनी चारीच्या रस्त्यांचा देखील विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला असून माहेगाव देशमुख व कोळपेवाडी येथील चाऱ्यांच्या लगत रस्त्यांना देखील ३० लाख रुपयांचा निधी दिला आहे. या निधीतून  माहेगाव देशमुख येथे १० लक्ष रुपये निधीतून चारी नं. ६ जाधव वस्ती ते पटेल वस्ती कोळपेवाडी येथे २० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या चारी नं. ६ सुनील जाधव घर ते ग्रामा १०१ रस्ता व चारी नं. ५ कोळपेवाडी – माहेगाव देशमुख शिव ते ग्रामा १०१ रस्ता मजबुतीकरण करणे कामाचे भूमिपूजन नुकतेच ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडले. हे रस्ते विकसित होणार असल्यामुळे वाड्या वस्त्यांवर राहणाऱ्या माहेगाव देशमुख, कोळपेवाडी व या रस्त्याने नियमित ये-जा करणाऱ्या नागरिकांनी ना. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.यावेळी पंचायत समिती उपसभापती अर्जुनराव काळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, संचालक सूर्यभान कोळपे, संभाजीराव काळे, सुंदरराव काळे, संजय काळे, शिवाजीराव काळे, मधुकर काळे, भास्करराव काळे, कचरू कोळपे, डॉ. प्रकाश कोळपे, प्रल्हाद काळे, सुनील जाधव, रविंद्र काळे, बाळासाहेब गुंड, सूर्यभान लांडगे, सतिश लांडगे, गणेश लांडगे, अमोल लांडगे, संजय जाधव, बापू वनसे, प्रमोद लांडगे, सुरेश लांडगे, लखन जाधव, अमोल जाधव, संजय खैरनार, कचरू कोळपे, डॉ. प्रकाश कोळपे, कैलास कोळपे, गणेश कोळपे, बबनराव कोळपे, राहुल कोळपे, सुनील कोळपे, रामदास कोळपे, ज्ञानेश्वर हाळनोर, दिपक कोळपे, जनार्दन कोळपे, मच्छिन्द्र कोळपे, साहेबराव कोळपे, दिपक कोळपे, नामदेव वर्पे, रामदास लांडगे, रावसाहेब काळे, अविनाश काळे, मयूर काळे, वसंत जाधव, श्रीकांत काळे, वैभव मुटकुळे, बाळासाहेब पानगव्हाणे, नितीन पानगव्हाणे, नंदकिशोर कोळपे, परसराम कोळपे, संजय कोळपे, जनार्दन गुमनर, महेश गुमनर, संतोष गुमनर, अण्णासाहेब गुमनर, मयूर कोळपे, गोरख कोळपे, सागर कोळपे, विक्रम कोळपे, महेश कोळपे, श्रावण शेंडगे, हनुमान कोळपे, दिगंबर थोरात, नामदेव थोरात, विशाल कोळपे, प्रभाकर चांडे, नवनाथ मोरे, बाजीराव वाघडकर, धर्मा कोळपे, विकास कोळपे, हनुमान हाके, नामदेव कोळपे, रभाजी कोळपे, धनंजय पांढरे, दत्तात्रय पांढरे, भाऊसाहेब खांडेकर, सोपान बाचकर, अझर सय्यद, अनिल कोळपे, आमीन पटेल, समीर पटेल, अल्ताफ पटेल, अकबर पटेल, अजीज पटेल, फय्याज सय्यद, सादिक सय्यद, मुनीर पटेल, अनवर पटेल, करीम पटेल, मोसिम पटेल, अजीम पटेल, रियान पटेल, शाहदाब पटेल, शकील पटेल, रज्जाक पटेल, हुसेन पटेल, रियाज पटेल, डॉ. इलियाज पटेल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे गाडे, ग्रामसेवक गोरक्षनाथ शेळके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे