क्रिडा व मनोरंजन

राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत कोपरगावच्या पाच खेळाडूंची निवड 

राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत कोपरगावच्या पाच खेळाडूंची निवड 
युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी स्विकारले प्रायोजकत्व
महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन द्वारे बारामती येथे घेण्यात आलेल्या निवड चाचणीत अहमदनगर संघाच्या पाच खेळाडूंची निवड झाली आहे.३६ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणाऱ्या या खेळडूंचे प्रायोजकत्व सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी स्विकारले असून संघाचे टी शर्ट अनावरण अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान याच्या हस्ते करण्यात आले.या वेळी शुभेच्छा देताना पराग संधान यांनी विवेकभैय्या कोल्हे यांच्या वतीने खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.कायमच कोल्हे कुटुंबीय हे खेळाडूंना वाव आणि संधी देण्यासाठी प्रयत्नशील असतात.आपल्या ग्रामीण भागातील खेळाडू देशपातळीवर चमकला पाहिजे यासाठी विवेकभैय्या कोल्हे हांचे सहकार्य व आग्रह असतो.
जाहिरात

अहमदनगर संघाच्या सात खेळाडूंनी सहभाग नोंदवला यांपैकी अक्षय आव्हाड (आंतरराष्ट्रीय खेळाडू), कन्हैया गंगुले (आंतरराष्ट्रीय खेळाडू), शमित माळी (राष्ट्रीय खेळाडू) यांची फेरनिवड करण्यात आली,तसेच अनुराधा भिंगारे (राष्ट्रीय खेळाडू),दुर्गा आव्हाड (राष्ट्रीय खेळाडू) या पाच खेळाडूंची निवड पुढील स्पर्धेसाठी झाली आहे. संगरुर येथे दि. २२ ते २७ नोव्हेंबर २०२३ होणाऱ्या ३६व्या राष्ट्रीय (वरीष्ठ पुरुष व महिला) अजिंक्यपद स्पर्धा पार पडणार आहे.या प्रसंगी अहमदनगर बेसबॉल संघटनेचे अध्यक्ष अरुण चंद्रे,सचिव मकरंद कोऱ्हाळकर व संघाचे प्रशिक्षक डॉ.सुनिल कुटे,संयोजक महेंद्र दादा नाईकवाडे,अक्षय नाईकवाडे,अशिष मेहेत्रे आदी. उपस्थितीत होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे